मंगळवार, १४ जून, २०१६

विज्ञान आधुनिकता

४.२२ विज्ञान आधुनिकता 

नॅनो टेकनॉलॉजी 

* सामान्यपणे मायक्रो म्हणजे मिलीमीटरचा हजारावा भाग तर नॅनो म्हणजे मिलीमीटरचा दशलक्षांशावा मीटरचा भाग होय. 

* अमेरिकेतील नोबल पुरस्कार विजेते मिस्टर फेमेण या संशोधकाने १९५९ मध्ये या तंत्रज्ञानाची संकल्पना मांडली. 

* या तंत्रज्ञानामुळे वाहनासाठी मायक्रोबॉट्सची रचना करून त्याद्वारे शरीरातील रक्तवाहिन्या अडथळे दूर करणे सहज शक्य झाले. 

* अत्यंत सूक्ष्मआकारात इलेक्ट्रोनिक यंत्राचे किंवा उपकरणाचे उपभाग जोडण्याचा आराखडा करणारे तंत्रज्ञान म्हणजे नॅनो टेकनॉलॉजी होय. 

क्लोनिंग  

* सस्तन प्राण्याची हुबेहूब प्रतिकृती करण्याचे तंत्र म्हणजे क्लोनिंग होय. सन १९९७ मध्ये डॉली नावाच्या मेंढीच्या रूपाने क्लोनिंगचे प्रात्यक्षिक जगास समजले. 

* सामान्यपने एकाच माता पित्याची वेगवेगळ्या वेळी जन्मास आलेली अपत्ये सारखी नसतात. सारखेपणा फक्त जुळ्यानमध्येच असतो. 

* एखाद्या शरीरातील केंद्रविरहीत स्त्रीबीज आणि दुसऱ्या शरीरातील पेशींचे केंद्रक यांच्या संयोगाने क्लोन जन्मतो.

* क्लोन प्रक्रियेत पुरुषांच्या शुक्राणुचा संबंध येत नाही. अपत्यहीन माता पिता यांच्यासाठी क्लोनिंग हे वरदानच ठरणार आहे.

जिनोम प्रोजेक्ट 

* मानवी गुणसूत्रामध्ये जीन कोठून येतात आणि त्यांच्यामध्ये कोणते गुण वाहून नेण्याची क्षमता असते हे निश्चित करणे हा जिनोम प्रकप्लाचा उद्देश होता.

* मानवी शरीराच्या पेशीत एक धागा डी ऑक्साईड रायबो न्युक्लीइक आम्लाच्या रेणूच्या असतो. प्रजननासाठी त्या धाग्यातील २३ एकक आईचे आणि २३ एकक वडिलाचे असतात.

* त्या ४६ गुणसूत्रात किंवा क्रोमोसोममध्ये एकूण ३ अब्ज मुलभूत गुणवाहक असतात. मुलभूत गुणवाहक एकत्र येवून एक जनुक किंवा जीन तयार होते.

* म्हणजे आपल्या DNA रेणूत असे ५० हजार ते १ लाख जनुके असतात. यात अनुवांशिक रोग कोणत्या जनुकामुळे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जाणार याची माहिती जीवशास्त्राची झालेली आहे.

* यात अनुवांशिक रोग कोणत्या जनुकामुळे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जाणार याची माहिती जीवशास्त्रांना झालेली आहे.

* मानवी DNA मध्ये ४ प्रमुख रेणू असतात. निरनिराळ्या प्रकारे परस्परामधून त्यांचा एक सर्पिल जिना असावा तसा DNA चा संपूर्ण रेणू बनतो.

एल निनो 

* एल निनोचा या शब्दाचा अर्थ बाल येशु असा असला तरीही त्या प्रक्रियेशी येशूचा काहीही संबंध नाही.

* एल निनो उबदार गरम सागरी पाण्याचा प्रवाह प्रत्येक वर्षी ख्रिसमस सुमारास पेरू आणि एक़्वाडोर किनाऱ्याला भेट देत असतो.

* याच काळात दक्षिण अमेरिकेच्या पच्शिम किनाऱ्यास मुसळधार पाऊस पडतो. हवामानातील हा फरक महत्वाचा ठरतो.

* एल निनोच्या काळात मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरात व्यापारी वाऱ्यांचा वेग कमी होतो. आणि नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडतो.

* एल निनोचा प्रभाव सर्व ठिकाणी सारखा नसतो. त्याचे जागतिक हवामानाचे परिणाम खूपच वेगवेगळ्या प्रकारचे आणि दूरगामी असतात.

* एल निनोमुळेच भारतात दुष्काळ व अमेरिकेत भरपूर पाऊस जास्त पडते. एल निनोमुळेच दक्षिण पेरुत दुष्काळ तर आणि पूर्व जावामध्ये पावसाळा कोरडा जातो.

 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.