रविवार, २६ जून, २०१६

चालू घडामोडी - कृषीविषयक

चालू घडामोडी - कृषीविषयक 

* भारत सरकार सर्वाधिक पामतेल\खाद्यतेल आयात मलेशिया व इंडोनेशिया या देशातून करते.

* संत्री फळावर प्रक्रिया करून संत्री फळाचा रस सोपॅक या नावाने विकला जातो.

* हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान हे तंत्र दुष्काळग्रस्त भागात जनावरांसाठी लागणारा चारा तयार करण्यासाठी वापरले जाते.

* राष्ट्रीय कृषी विकास योजना २००७ पासून सुरू केली आहे आणि या योजनेत कृषी विकास दर ४% पर्यंत नेण्याचे ठरवले आहे.

* केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अहवालानुसार सन २०१५ मध्ये भारतातून सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाची निर्यात होणारे फळपीक द्राक्षे आहेत.

* भारतातील सर्वाधिक रोजगार मिळवून देणारे उद्योग अनुक्रमे वस्त्रोद्योग व साखर उद्योग हे आहेत.

* कापूस व रेशीम उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर चीन हा देश आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर भारत हा देश आहे.

* देशात सर्वात जास्त कृषी यांत्रिकीकरण झालेले राज्य पंजाब आहे आणि भारतात एकूण कृषी यांत्रिकीकरण २२% झालेले आहे.

* जगातील सर्वात जास्त सोयाबीन उत्पादक देश अमेरिका आहे.

* सध्या भारतातील एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे ४६% क्षेत्र जलसिंचनाखाली आहे.

* देशातील पाहिले सेंद्रिय शेती करणारे राज्य सिक्कीम ठरले आहे यासाठी २००३ पासूनच हे राज्य प्रयत्नात आहे.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.