रविवार, १९ जून, २०१६

त्सुनामी लाटा

त्सुनामी लाटा 

* समुद्राच्या तळाशी किंवा समुद्रकिनाऱ्याच्या जमिनीखाली भूकंपाच्या धक्क्यामुळे ज्या प्रचंड लाटा निर्माण होतात. त्यानी जपानी भाषेत त्सुनामी लाटा या नावाने ओळखले जाते.

* सागरी भूकंपातील त्सुनामीची निर्मिती होते. खरेतर सागरी भूकंपाची तीव्रता हि जमिनीवरील भूकंपापेक्षा अत्याधिक असून तिचे प्रभावक्षेत्र हजारो किमी असते.

* बंदरावरील लाटा ज्या त्सुनामी नावाने ओळखल्या जातात त्यांच्या निर्मितीचे मुख्य कारण म्हणजे समुद्रतळावर किंवा समुद्रतळाशी होणारा भूकंप होय.

* त्सुनामी लाटांचा वेग सुरवातीस ८०० किमी असतो. नंतर त्या लाटांची उंची वाढत जाते. आणि किनाऱ्यावर आदळेपर्यंत त्या लाटांची उंची सुमारे ५० ते ६० फुट एवढी असते.

त्सुनामीची कारणे 

* जेव्हा सागरतळावर प्रस्तरभंग होतो किंवा तळाखाली भूहालचाली होऊन तळाशी पातळी वर खाली होते, तेव्हा त्सुनामी लाटा तयार होतात.

* जेव्हा सागरतळातील डोंगराळ भागावर जमिनीची घसरण होते तेव्हा घसरणीत दगड धोंड्याचा समावेश वाढतो त्यातूनच त्सुनामीची निर्मिती होते.

त्सुनामीसाठी व्यवस्थापन 

* समुद्रकिनारी भागामध्ये निरनिराळ्या यंत्राद्वारे भू - हालचालीची सतत माहिती घ्यावी.

* नैसर्गिक होणारे बदल अभ्यासून त्या संदर्भात भविष्यकालीन कार्यवाहीकडे वळावे.

* धोक्याची पातळी व सूचना मिळताच तत्काळ किनारी भागातील स्थलांतर करून मासेमारी करणे, नौकायन किना अन्य सर्व कार्यास बंदी करावी.

* किनारी भागातील दळणवळण व्यवस्था, संपर्कासाठी हवाई सेवा उपलब्द केलेली असावी.

* या भागात हवाई सेवा उपलब्द करून द्यावी, वैद्यकीय सेवा उपलब्द करून द्यावी.

* किनारपट्टीवर बचावासाठी नारळाची झाडे उपयुक्त असल्याने एकतर झाडावर चढून जावे किंवा लाट ओसरेपर्यंत झाडाच्या बुंध्याला घट्ट पकडून ठेवावे.

* लाटेपासून तोंडाचा, चेहऱ्यांचा, डोक्याचा बचाव करण्यासाठी झाडापासून डोक्याचे अंतर निश्चित करावे. आणि घट्ट दोन पायावर तोल सांभाळता येईल असे उभे राहावे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.