रविवार, १९ जून, २०१६

भारतातील व जगातील प्रमुख भूकंप

भारतातील व जगातील प्रमुख भूकंप 

खिल्लारी भूकंप १९९३

* महाभयानक आपत्तीच्या खिल्लारी भूकंपाचे एक भूवैज्ञानिक आव्हानच आहे. ३० सप्टेंबर १९९३ रोजी महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील खिल्लारी गावाला प्रमाणवेळेप्रमाणेच २९ सप्टेबर रोजी १० वाजून २६ मिनिटानी म्हणजे पहाटे ३ वाजून ५३ मिनिटांनी भूकंपाने अपघात केला.

* लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे २० गावातील १५ किलोमीटरच्या परिसरात १०,००० लोकांना मरण पत्करावे लागले.

* भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण पठाराच्या मध्यवर्ती भागातील रुपांतरीत खडकस्तराला धक्का देणाऱ्या त्या भूकंपाने प्रचंड प्रमाणात नुकसान पोहोचविले.

* अचानकपणे निर्माण झालेल्या या भूकंप आपत्तीने मोठ्या प्रमाणात वित्तहानी व प्राणहानी झाली. भूकंपाने सजीव सृष्टीला जो धोका पोहोचविला आहे त्यापूर्वी सन १८४३ मधील बेलोरीचा भूकंप, सन १९०० मधील कोईमतूर व सन १९९३ मधील खिल्लारीचा भूकंप उल्लेखनीय आहेत.

* सन १९६७ च्या कोयना भूकंपानेसुद्धा मोठ्या प्रमाणात विध्वंसक कार्य केलेले आहे. सन १९९३ च्या खिल्लारी भूकंपाने मोठ्या प्रमाणात भूकवचाला फोडून काढले.

* भूकंपाच्या तीन आठवड्यानंतर झालेल्या पाहणीत वायव्येकडील १ किमी ते १.५ किमी परिसरात संमिश्र स्वरूपाचे भूकवच तोडले गेले.


गुजरात भूज भूकंप २००१ 

* भारतीय ५२ व्या प्रजासत्ताक दिवशी म्हणजे २६ जानेवारी २००१ रोजी सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी गुजरातमधील कछ जिल्ह्यातील बचावू तालुक्यातील चोबारी गावाजवळ भूकंपाचा धक्का बसला.

* त्याची वास्तविकता म्हणजे २६ जानेवारी २००१ या साली भूकंप याचा धक्का बसला. स्थान भूज परिसर गुजरात येथे हा भूकंप झाला. कमाल तीव्रता १० रिक्टर स्केल च्या पेक्षा जास्त होती. खोली गहनता १६ किमी एवढी होती.

* या भूकंपात १९,७२७ लोक मृत्यूमुखी पडले. व १,६६,००१ एवढे झण झाले होते. कछ जिल्ह्यातील चोबारी गावाजवळ झालेल्या या भूकंपाचे चुंबकीय प्रमाण ७.६ आणि ७.७ असे होते.

* त्याची रिक्टर स्केल क्षमता १० एवढी होती. त्यामुळे या भूकंपाची तीव्रता सगळ्यात जास्त होती असे सांगण्यात येते.

सिक्कीम भूकंप २०११ 

* सिक्कीम २०११ या भूकंपाला हिमालय २०११ या नावानेदेखील संबोधले जातील. भारतीय राज्य सिक्कीम आणि नेपाळच्या सीमेवर झालेल्या या भूकंपाची वेळ संध्यकाळी ६ वाजून १० मिनिटांनी १८ सप्टेंबर होती.

* ईशान्य भारतामध्ये झालेल्या या भूकंपाचा संबंध भारत, नेपाल, भूतान बांगलादेश आणि तिबेट या देशाशी होता.

* भूकंपाची वास्तविकता म्हणजे १८ सप्टेंबर २०११ या साली झाला. भूकंपाचा कालावधी ३० ते ४० सेकंद एवढा होता. भ्काम्पाची खोली १९.७ किमी एवढी होती.

* भूकंप क्षमता ६.९ एवढी होती. या खेरीज सिक्कीमच्या या भूकंपात सिंगतामजवळील पूर्व सिक्कीम जिल्ह्यातील व्यक्तीवर आघात पोहोचला.

* काठमांडू ब्रिटीश एबसिची इमारत या परिसरात भूकंपाने पडली. नेपाळ मधील ११ व्यक्ती मृत्यूमुखी पडले.

फुकुशिमा भूकंप २०११ 

* जपानच्या फुकुशिमा या ठिकाणी ११ एप्रिल २०११ रोजी संध्याकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी मोठ्या प्रमाणात भूकंपाचा आघात झाला. त्या भूकंपाची वास्तविकता पुढीलप्रमाणे आहे.

* जपानच्या या भूकंपात २,२०,००० व्यक्ती बेघर झाले. मोठ्या प्रमाणात बांधकाम क्षेत्राचे नुकसान झाले.

बांदाआच भूकंप २००४ 

* हिंदी महासागरात २००४ साली उसळलेल्या भूकंपाने इंडोनेशिया, श्रीलंका आणि भारत परिसरात भूकंपाचा धक्का बसला.

* या भूकंपामध्येच बांदाआच हे प्रमुख स्थान असल्याने तो भूकंप बांदाआच २००४ या नावाने संबोधला गेला.

* २६ डिसेंबर २००४ या रोजी इंडोनेशिया या देशात ९.३ तीव्रतेचा व त्याची गहनता ३० किमी एवढी होती. या भूकंपाचे परिणाम म्हणजे २,३०,२४० मृत्यूमुखी झाले.

   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.