शुक्रवार, १७ जून, २०१६

अणुचाचणी

५.९ अणुचाचणी

* हिंदुस्तानातील स्वतंत्र मिळाल्यानंतर पंतप्रधान पं नेहरू यांनी रोजी १९४८ मध्ये अणूधोरण मंजूर केले. त्यानुसार केंद्र सरकारने अणुउर्जा आयोगाची स्थापना केली.

* तसेच एनर्जी एस्टब्लीशमेंट ऑफ ट्रॉम्बेची स्थापना सन १९५४ मध्ये करण्यात आली. सन १९४८ ते १९५४ या काळात अणुउर्जा आयोगाचे कार्य नैसर्गिक स्त्रोत आणि वैज्ञानिक संशोधन मंत्रालयाच्या अख्यत्यारीस होते.

* तसेच ४ अगस्ट १९५७ रोजी हिंदुस्तानने अप्सरा हि पहिली अणुउर्जा भट्टी कार्यान्वित केली. तुर्भे येथेच सन १९५८ सायरस व सन १९६१ मध्ये झर्लीना ही अणुभट्टी कार्यान्वित केली.

जागतिक स्तर 

* आज अमेरिकेजवळ ८,७३३ परमाणु अस्त्रे आहेत. तसेच अमेरिका अविकसनशील राष्ट्रांना दरवर्षी ९८९ कोटी अमेरिकेची डॉलर्स युद्धसामुग्री विकतो आहे.

* हिरोशिमा व नागासाकी या शहरावर टाकलेले अणुबॉम्ब १५ व २० किलो टन शक्तीचे होते. इथे १५० किलो टन हे किमान प्रमाण धरलेले आहे.

* जगातील प्रमुख अणुभट्ट्या अमेरिकेत १०९, फ्रान्समध्ये ५६, जपानमध्ये ४९, इंग्लंड ३५, रशिया २९, कॅनडा २२, जर्मनी २१, युक्रेन २१, स्वीडन १२, भारतात १० आहेत. भारताने अलीकडेच अण्वस्त्र कमांड प्राधिकरणाची स्थापना केलेली आहे.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.