रविवार, १९ जून, २०१६

भूकंपाची कारणे

भूकंपाची कारणे 

* पृथ्वीच्या संतुलित व्यवस्थेत बदल झाला तर भूकंप उद्भवतात.

* ज्वालामुखीच्या उद्रेकाने तप्त लाव्हारस भूपृष्टवर येउन साचतो. त्याच्या दाबामुळे भूपृष्ठ याच्यावर हादरे बसतात.

* भुकवचाचे संतुलन होण्यास भूपृष्ठ याच्यावर झीज आणि भर कारणीभूत ठरतात. त्यातूनच जेथे झीज होते तेथील वजन कमी होते.

* अपसारी अभिसरणामुळे भूकवचात ताणनिर्मिती होऊन भेगा पडतात. दाबामुळे खडकांना वळ्या पडून हालचाली निर्माण होऊन भूकंप होतात.

* भूपृष्टातून अंतर्गत भागात पाणी झिरपते. आतील प्रचंड उष्णतेने त्या पाण्याची वाफ होते व ती वाफ कमकुवत पृष्ठभागातून बाहेर येण्याचा प्रयत्न करते तेव्हा भूकंप होतात.

* पृथ्वीच्या आतील उर्जेने शक्तीने खडकावर दाब पडून तणाव निर्माण होतात. तेव्हा प्रस्तरभंग होऊन भूकवचात कंपन सुरु होते.

* पृथ्वीवरील भूकवच सलग नसून त्याचे लहान पट्ट्यामध्ये विभाजन झालेले आहे. ते सर्व भूमंच तरंगत असून परस्पराविरुद्ध दिशांनी सरकतात.

* अणुचाचण्या भूमिगत स्फोटामुळे भूकंप होतात. प्रचंड पाण्याच्या साठ्याने मोठ्या धरणाने जमिनीवर दाब पडून खडकांचा भ्रंश होऊन संतुलन बिघडते व कंपायमान सुरु होते.

* प्रचंड मोठमोठ्या खोलवर गेलेल्या खाणकामामुळे प्रस्तरभंग होतात. खडकांचे संतुलन बिघडते व भूकंप याचा धक्का बसतो.

भूकंपाची तिव्रता    

* भूकंपाच्या तीव्रतेचे गणित सात स्तरावर मोजले जाते. त्यामध्ये सामान्य ते महाभयानक विनाशकारी भूकंपाचा समावेश आहे.

* भूकंप विध्वंसक ग्रेट - ८ किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रता. जबरदस्त मेजर ७ ते ७.९ तीव्रता. शक्तीशाली ६ ते ६.९ तिव्रता, मोठा किंवा मॉडरेट ५ ते ५.९ तिव्रता, हलका किंवा लाईट ४ ते ४.९ तिव्रता, सामान्य मायनर ३ ते ३.९, अतिसामान्य व्हेरी मायनर ३ पेक्षा कमी.

भूकंपापुर्वी दक्षता 

* भौगोलिकदृष्ट्या सर्व भूप्रदेशाचा अभ्यास करून भूकंप क्षेत्र निश्चित करावे. भूकंप क्षेत्रामध्ये ठराविक अंतरावर भूकंपाची भुगर्भाची हालचालीची नोंद घेणाऱ्या प्रयोगशाळांची यंत्राची उभारणी करून त्या प्रयोगशाळा क्रियाशील ठेवाव्यात.

* भूकंप क्षेत्रामध्ये मोठे जलविद्युत प्रकल्प, मोठे बांध करणे, उभारण्याचे प्रयत्न करू नये. शक्यतो लहान बंधारे बांधून जलसिंचनाच्या सोई करून घ्याव्यात.

* भूकंपग्रस्त भागात मदत कार्य करणाऱ्या संस्थांची केंद्राची उभारणी करावी. भूकंपग्रस्त भागात मदत कार्य करणाऱ्या संस्थांची केंद्राची उभारणी करावी.

* भूकंपग्रस्त भागामध्ये अन्नपदार्थ, कपडेलत्ते, पाणीपुरवठा इत्यादीच्या तत्काळ पुरवठ्याची हवाई सेवा उपलब्द करावी.

* भूकंपग्रस्त भागामध्ये वसतिस्थाने विखुरलेल्या स्वरुपात निर्माण करावीत. लाकडी फळ्यांचा, बांबूंचा किंवा सिमेंटच्या पत्र्यांचा उपयोग करून निवासस्थाने उभारावीत.

* ट्यूबवेल किंवा बोअरवेल यांची संख्या वाढवू नये. ठराविक किलोमीटर क्षेत्रात किती ठिकाणी भूगर्भाला छेद द्यावा यासाठी कडक नियंत्रण करावे.


  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.