शुक्रवार, १७ जून, २०१६

अणुशक्ती संशोधन संस्था

५.१३ अणुशक्ती संशोधन संस्था 

* भारतामध्ये विविध अणुसंशोधन संस्था केंद्राची स्थापना झाली आहे. त्यापैकी खालीलपैकी काही आहेत.

* भाभा अणुसंशोधन केंद्र ट्रॉम्बे - मुंबई [ महाराष्ट्र ], टाटा इन्स्टीटयुट ऑफ फंडामेंटल रिसर्च - मुंबई, हाय अल्टीटयुट रिसर्च लेबोरटरी गुलमर्ग - जम्मू काश्मीर, इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटर मुंबई - महाराष्ट्र, शाहू इन्स्टीट्युट ऑफ न्युक्लिअर फिजिक्स - कोलकाता इत्यादी अनुसंशोधन संस्था आहेत.

भाभा अणुसंशोधन केंद्र - तुर्भे [ Bhabha Atomic Resarch Centre - Trombe ]

* भारतात अग्रेसर आणि आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त झालेल्या या अनुकेंद्राचे नामकरण डॉ होमी भाभा जहागीर यांच्या नावाने झालेले आहे.

* भारताच्या दीर्घ मुदतीच्या विद्युत उर्जेची गरज भागविण्यासाठी इ. स. १९४८ मध्ये भारतीय अणुउर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली.

* भारत सरकारने १९५४ मध्ये स्वतंत्र अणुउर्जा खात्याची स्थापना केली त्यानंतर २० जानेवारी १९५७ रोजी या केंद्राचे उदघाटन त्या वेळचे पंतप्रधान पं जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले.

* अणुउर्जेचा विकास करणे व त्या उर्जेचा दैनदिन जीवनात कसा उपयोग करता येईल, याविषयीचे संशोधन करणे, वैद्यकीय व्यवसाय जैविक शास्त्रे इत्यादी क्षेत्रांचा विकास करणे. 

केंद्राची कार्ये 

* किर्नोस्तारी संस्थानिकांची निर्मिती व त्यांचे परीक्षण करणे, अणुभट्टीमध्ये वापरण्यास योग्य शुद्ध युरेनियम धातू व त्याच्यापासून इंधन घटक बनविण्याचे संशोधन या केंद्रात केले जातात.

* १९५९ मध्ये प्रथमता याप्रकारचे शुद्ध युरेनियम बनविण्यात आले, सायरस या अणुभट्टीत लागणारे अल्युमिनिअम अमवेष्टित वापरण्यास योग्य इंधन याच ठिकाणी तयार केले आहे.

* युरेनियम ऑकसाईड गुलिका झिकार्णोनियमच्या मिश्रधातू अवेष्टीत केल्या जातात. तसेच कच्च्या झीकार्णोनियम निष्कर्षण व शुद्धीकरण करण्याचे तंत्रज्ञान येथे विकसित करणात येते.

भारतातील अणुउर्जा प्रकल्प  

* तुतीकोरीन प्रकल्प - १९४८ साली सुरवात, जर्मन कंपनीच्या तांत्रिक आधारे, सदर्न पेट्रोकेमिकल्स इंडस्ट्रीज खत कारखान्याशी संलग्न, वार्षिक ७१.३ टन अवजड पाण्याचे उत्पादन.

* तालचर प्रकल्प - १९७९ साली प्रकल्पाची सुरवात, जर्मन कंपनीचे तांत्रिक सहाय्य, तालचर फर्टीलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कारखान्याशी संलग्न आहे. वार्षिक ६२.७ टन अवजड पाण्याचे उत्पादन. हैद्राबादच्या आण्विक इंधन संकुलाचे सहाय्य.

* तारापूर अणुशक्ती केंद्र - भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र, अमेरिकन जनरल इलेक्ट्रिकल्स यांचे तांत्रिक सहाय्य, दोन उकळत्या पाण्याचे संच, समृद्ध युरेनियम इंधनाचा उपयोग, ४२० मेगावट विजनिर्मिती, महाराष्ट्र व गुजरातला वीजपुरवठा.

* राजस्थान अणुशक्ती केंद्र - १९९१ साली पूर्णत्वास आलेले, सुरवातीस कॅनडा कंपनीचे सहाय्य पण नंतर भारतीय तंत्राने पुर्णता, युरेनियम इंधनाचे केंद्र, अवजड पाण्याचे कंडू प्रकारचे दोन प्रकल्प, क्षमता २२० कि vat.

* मद्रास अणुशक्ती केंद्र - प्रथम भाग १९८० व द्वितीय १९८९ साली पूर्णत्वास, राजस्थानप्रमाणे दोन कंडू प्रकारचे संच, विदेशी सहकार्य नसून ८०% भाग देशी.

अणुउर्जा मंडळे 

* अमेरिकेत सन १९४६ पूर्वी अणुउर्जाविषयक धोरण युद्धखात्याच्या एका विभागामार्फत ठरविले जात असे, इ स १९४६ मध्ये काँग्रेसने कायदा करून अणुउर्जा आयोगाची आटोमिक एनर्जी कमिशन याची स्थापना केली.

* अणुउर्जाविषयक सन १९५४ च्या कायद्यानुसार ब्रिटनमध्ये आटोमिक एनर्जी ऑथोरिटी या मंडळाची स्थापना केली गेली.

* शांततामय कार्यासाठी अणुउर्जेचा विनियोग करावा, हे उदिष्ट सर्व राष्ट्रांचे आहे. परंतु सर्वच राष्ट्राजवळ त्यासाठी आवश्यक असे तांत्रिक ज्ञान व साधनसामुग्री असणे शक्य नाही.

* त्यासाठी आंतरराष्ट्रीय कार्यावरच अशा राष्ट्रांना अवलंबून राहावे लागते. या दृष्टीने इ स १९५७ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी व्हिएन्ना येथे आंतरराष्ट्रीय अणुउर्जा मंडळ स्थापन केले आहे.


 0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.