शुक्रवार, १० जून, २०१६

इंटरनेटचे उपयोग

२.५ इंटरनेट 

* इंटरनेट म्हणजे खरोखरच ज्ञानाचा एक महान कल्पवृक्ष होय. या संगणकीय जाळ्याचा कुणी मालक नाही किंवा सर्वेसर्वा नाही.

* त्यावर कुण्याव्यक्तीचा व देशाचा अधिकार नाही, माहितीची देवाणघेवाण अतिशय वेगवान गतीने करणारा इंटरनेट खरंच एक अदभुत प्रकार आहे.

* जो कुणी स्वतः संगणक इंटरनेटला जोडेल तो इंटरनेटचा सहभागी होईल, त्यावर कुणाचेही बंधन नाही.

* इंटरनेटवर समाज, विज्ञान - तंत्रज्ञान, वैद्यकीय, वाणिज्य आणि कलेच्या ज्ञानाचे भांडार आहे. मानवी बुद्धीची ही आश्चर्यकारी झेप म्हणजे २१ व्या शतकातील देणगीच होय.

इंटरनेटचे उपयोग 

* शैक्षणिक - इंटरनेटद्वारे विविध विद्यापीठ व संस्थाच्या अभास्क्रमातून शैक्षणिक कार्य पूर्ण करणे शक्य आहे. तसेच रजिस्ट्रेशन, चाचणी, परीक्षा, निकाल, इत्यादी कार्यवाही होते.

* व्यवसाय\नोकरी - यासारख्या सेवांची माहिती इंटरनेटद्वारे प्राप्त होते. रोजगार कुठे उपलब्द आहे शोध इंटरनेटद्वारे परिपूर्ण होऊ शकतो.

* संदेशवहन - आज संपर्क क्षेत्रात दळणवळणाच्या सर्व साधनात संगणक, इंटरनेट त्वरित संदेशवहन करणे शक्य होते.

* करमणूक - मनोरंजन किंवा करमनुकीसाठी इंटरनेटचे माध्यम उपयुक्त आहे. निरनिराळ्या निसर्गचित्रांचा आस्वाद घेणे. मधुर संगीत गाणे ऐकणे, सिनेमा पाहणे इद्यादी शक्य आहे.

* पर्यटन - याद्वारे जगभरातील कोणत्याही स्थळांची माहिती मिळते.

* ग्रंथालय - हौशी कार्यासाठी इंटरनेटचे माध्यम अनेक प्रकारे उपयुक्त आहे जसे ग्रंथभांडार, वृत्तपत्रे, मासिके, आणि पुस्तकातील साहित्य इंटरनेटचा उपयोग होतो.

* संशोधन - अनेक क्षेत्रातील संशोधनासाठी इंटरनेटचा उपयोग करता येतो.

* संदर्भ - शिक्षणप्रेमी व्यक्ती, विचारवंत, शिक्षक, प्राध्यापकासासाठी, इंटरनेट द्वारे संदर्भ उपयुक्त पाहता येतो.

* ई कॉमर्स - आपणाला घरबसल्या एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर व्यापारवृद्धीसाठी इंटरनेटचा उपयोग या माध्यमातून होतो.

* छायाचित्रे - निरनिराळ्या छायाचित्रांचा आपण देवाणघेवाण या इंटरनेट च्या माध्यमातून होतो.

प्रोटोकॉल 

* सर्वसाधारण प्रोटोकॉल्स म्हणजे निच्शित करण्यात परराष्ट्रीय संबधित शिष्टाचाराचे नियम होत. इंटरनेटवरील माहितीची देवाणघेवाण, आदानप्रदान सुलभतेने व्हावी यासाठी प्रोटोकॉल तयार केले.

* प्रोटोकॉलचे संदेशामध्ये रुपांतर करण्याचे कार्य नेटवर्कवरील होस्ट संगणक करतात.

* एका संगणकावरून दुसऱ्या संगणकाकडे संदेश मिळवण्याचे उत्तर पुरवण्याचे कार्य प्रोटोकॉल मुळे होते. त्यांना इंटरनेट प्रोटोकॉल कडून होते. हे pakets च्या स्वरुपात असतात.

मोडेम  

* संगणक आणि टेलीफोनलाईन मधील असणारे साधन म्हणजे मोडेम होय. संगकाच्या डिजिटल संदेशाचे अनोलॉग मध्ये टेलिफोनलाईन वरून येणाऱ्या अनोलॉग संदेशाचे डिजिटल मध्ये रुपांतर करणारे हे साधन होय.

* मोडेम हा अमेरिकेने तयार करण्यात आलेला नवीन शब्द आहे. मोड्युलेटर आणि डी मोड्युलेटर या दोन शब्दांची रचना करून [ मॉडेम ] हा शब्द तयार करण्यात आला.

डोमेन 

* डोमेन हा इंटरनेट पत्त्यासाठी कॉम्प्यूटरचे नाव दर्शविणारा विभाग होय. अडचण आली कि मार्ग सुचतो या प्रत्ययाशी दैनदिन व्यावहारिक नियमानुसार इंटरनेट जोडलेल्या संगणकाला नाव देण्याची एक कार्यपद्धती आहे.

* ती कार्यपद्धती डोमेन नेम सिस्टीम DNS या नावाने ओळखली जाते. डोमेन नेम प्रत्येक शब्द दोन किंवा त्यापेक्षा जास्त अक्षरे असतात.

* ज्याप्रमाणे com - व्यापारी संघटन, edu - शैक्षिणिक संघटन, gov - सरकारी संघटन, int - आंतरराष्ट्रीय संघटन, mil - सैनिकी संघटन.  


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.