शनिवार, ११ जून, २०१६

भारताचे अवकाश कार्यक्रम

३ अवकाश तंत्रज्ञान 

३.१ भारताचे अवकाश कार्यक्रम 

क्षेपणयान 

* पृथ्वीच्या कक्षेत किंवा पृथ्वीच्या बाहेर तिच्या गुरुत्वाकर्षण याच्या बाहेरील अवकाशामध्ये एखादी वस्तू पाठविणे, रेटने किंवा फेकणे म्हणजे त्या वस्तूचे क्षेपण होय. त्यासाठी उपयोगात येणाऱ्या यानास क्षेपणयान म्हणतात.

* अवकाश क्षेपनायानचा पल्ला आणि रेटा अधिक असतो. त्यांची मार्गदर्शी यंत्रणासुद्धा अत्याधिक कार्यक्षम असते.

* त्याच्या उड्डाणाच्या दिशेचे नियंत्रण त्याच्यातील स्वयंचलित यंत्रणेमुळे किंवा जमिनीवरील नियंत्रक यंत्रणेने रेडीओ तरंगाच्या सहाय्याने केले जाते.

* त्यानंतर अलीकडे अणुशक्तीवर चालणारी रॉकेट चालवण्यासाठी प्रयोग झाले आहेत. सौरशक्तीचा आणि विद्युतशक्तीचा उपयोग करून रॉकेट धाऊ लागली आहेत.

अवकाशयान 

* अवकाशयानाचा तळभाग क्षेपणायानाच्या वरच्या टोकास जोडलेला असतो. त्या यानात वस्तू ठेवण्याची व माणसे बसण्याची व्यवस्था केलेली असते.

* पृथ्वीभोवतीच्या कक्षेत फिरण्यासाठी आवश्यक तेवढा वेग मिळाल्यावर अवकाशयान फिरत राहण्यास जास्त उर्जेची आवश्यकता नसते.

* विशिष्ट कक्षेत फिरण्यासाठी अवकाशयानाला एक विशिष्ट वेग द्यावा लागतो. दिलेला वेग अत्याधिक असेल तर ते गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या बाहेर जाऊ शकते. किंवा वेग कमी असेल तर पृथ्वीकडे खेचले जाऊ शकते.

* त्यामुळे अवकशात फिरत असताना यांनाच्या दिशेने बदल करणे, दुरुस्ती करणे, यानाचा वेग कमी जास्त करणे, यान कक्षेतून निघून पृथ्वीकडे परत प्रवासास निघणे इत्यादी निरनिराळी कामे रॉकेट द्वारे केली जातात.

आंतरराष्ट्रीय क्षेत्रात पहिले प्रक्षेपण 

* सोव्हिएत संघ - १९५७ - स्पुटनिक १
* अमेरिका - १९५८ - एक्सप्लोइर
* फ्रान्स - १९६५ - एस्टेरिक्स १
* जपान - १९७० - ओसुमी
* चीन - १९७० - डांग फांग होंग १
* ब्रिटन - १९७० - पोस्पेरो X ३
* भारत - १९८१ - आफेक १


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.