शनिवार, १८ जून, २०१६

आपत्ती व्यवस्थापन स्वरूप

५ आपत्ती व्यवस्थापन - Disaster Management 

आपत्ती व्यवस्थापन स्वरूप 

* सजीव सृष्टीवर अचानक ओढवलेले संकट किंवा अरिष्ट, अपघात किंवा दु:खद घटना [ महापूर, भूकंप, ज्वालामुखी, उद्रेक, आग, वादळ, बॉम्बस्फोट, युद्ध, वीज कोसळणे, रोगराई, अवर्षण, जलप्रलय वायुगळती. म्हणजेच आपत्ती होय.

* संरक्षण व सामरिक विज्ञानाच्या बदलत्या स्वरूपवर त्याच्या आपत्तीचे व्यवस्थापन आवश्यक असते. मानवी जीवनाची जीवनपद्धती बदलविणारी आपत्ती नैसर्गिक स्वरुपाची किंवा मानवी स्वरुपाची असू शकते.

* आपत्तीविषयक परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे, धोकादायक परिस्थती निवळने म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय.

* नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती ह्या दोन प्रकारच्या आपत्त्या आहेत. त्यातील भूमौतिक आपत्ती म्हणजे महापूर, वादळे होय. तर मानव निर्मित आपत्ती म्हणजे आग, वायुगळती, मानवी बॉम्ब, अपघात, संप इत्यादी होय.

जग भौगोलिक परिस्थिती   

* भौतिक बदलाच्या इतिहासात कोट्यवधी वर्षापूर्वी पृथ्वी म्हणजे अतिशय तप्त वायू आणि धुळीचा प्रचंड फिरता गोळा होता.

* निरनिराळ्या नैसर्गिक असंतुलानातून, घडामोडीच्या उद्रेकातून त्या तप्त वायू व धुळीच्या पृथ्वीगोलावर त्याचा परिणाम झाला.

* सुमारे १८ कोटी वर्षापूर्वी पृथ्वी म्हणजे महाकाय भूभाग होय, त्या भूभागाला पंजीया या नावाने ओळखला जायचा. सुमारे १२ कोटी वर्षापूर्वी पृथ्वी एक महाकाय पंजीया दुभंगून लोरेशिया व गोंडवाना दोन खंड तयार झाले.

* या सर्व नैसर्गिक भौगोलिक परस्थिती आणि हालचालीतून अनेक प्रकारची आपत्ती, उर्जा तयार झाली. त्यातून त्या कालावधीत कीटक, प्राणी, वनस्पती इत्यादी सर्व सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम झाले.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.