सोमवार, १३ जून, २०१६

शाश्वत विकास

४.२ शाश्वत विकास 

* मानवी विकास व पर्यावरण यांचा अतूट संबंध आहे. पर्यावरणाचे नैसर्गिक संतुलन राखण्याकरिता मानवाच्या क्रियाकर्मात अशा पद्धतीने बदल करणे गरजेचे आहे.

* ज्याद्वारे पर्यावरणाचा घटकाचा कमीत कमी ऱ्हास होऊन मानवी विकास साधला जाईल. अशा विकासाला शाश्वत विकास म्हटल्या जाते.

* भावी पिढीच्या गरजा पूर्ण करण्याची पर्यावरणाची क्षमता कायम ठेवून पर्यावरणाचा ऱ्हास न करता वर्तमान पिढीच्या सर्व गरजा पूर्ण करणारा विकास म्हणजे शाश्वत विकास होय.

* शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय व नैसर्गिक खतांचा वापर करणे. त्याद्वारे जमिनिची पोषण क्षमता कायम राखली जाईल.

* पवन, सौर, जल, जैविक उर्जा यासारख्या अक्षय उर्जा साधनांचा उपयोग करून उर्जा संवर्धन करणे.

शाश्वत विकासाची क्षेत्रे 

* शाश्वत उर्जा - क्षय उर्जा यांचे साठे २४०-७५ अब्ज टन असून दरवर्षी सुमारे ४०० दशलक्ष टन कोळसा वापरला जातो.  याच प्रमाणात जर कोळसा वापरला तर १५० वर्षापर्यंत साठे पुरतील. म्हणून उर्जा साधने जशी सौर, पवन, जलीय, लाटा, व जैविक पूर्ततेसाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करावा लागतो.

* शाश्वत हवा - सजीवांच्या अस्तित्वाकरिता हवेची अत्यंत गरज आहे. वातावरणाच्या हवेच्या घटकाचे यांचे प्रमाण निच्शित असते. कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढल्यामुळे वातावरणाचे तापमान वाढत आहे.

* लोकसंख्या - जागतिक लोकसंख्या झपाट्याने वाढत असून पहिल्या शतकात लोकसंख्या २५ कोटी होती. ती आता वाढत ६१३ कोटी एवढी झाली आहे.

शाश्वत विकासात विचारांचे आव्हान 

* सामाजिक विचार - समाजाला जेव्हा आपल्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागते तेव्हा चिपकोसारख्या चळवळीची जन्म होतो. १७३१ मध्ये चिपको चळवळ सुरु झाली. अशा प्रकारची वैचारिक सामाजिक विचार असतात.

* राजकीय विचार - प्रत्येक देशात विविध राजकीय प्रणाली कार्य करीत आहेत. प्रत्येक राजकीय प्रणालीची तत्वे समाज विकास व निसर्ग कल्याणाशी निगडीत आहेत.

* आर्थिक विचार - शाश्वत विकास आर्थिक विकासावर आधारित आहे. आर्थिक विकास साधताना नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होता कामा नये. मानवाच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत आर्थिक विकास आवश्यक आहे.

 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.