मंगळवार, २८ जून, २०१६

चालू घडामोडी २० ते २८ जून २०१६

चालू घडामोडी २० ते २८ जून २०१६

* भारतीय हवाई दलात अवनी चतुर्वेदी, भावना कंठ, आणि मोहना सिंग या तीन लढाऊ विमानांच्या पहिल्या वैमाणिक होण्याचा मान मिळाला आहे.

* भारताला आण्विक पुरवठादार संघटनेच्या NSG सद्यस्त्वासाठी फ्रान्सने पाठिंबा दिला आहे परंतु चीनने यासाठी विरोध दर्शविला आहे.

* भारतातील २ कोटी लोकांना रोजगार पोहोचविणाऱ्या वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी सहा हजार कोटी पॅकेज ची घोषणा करून रोजगारनिर्मिती व निर्यातीसाठी धोरण राबविले आहे.

* भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १ वर्षासाठी भारतीय क्रिकेट टीमचा प्रशिक्षक म्हणून घोषित केले आहे.

* वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर कार्बन उत्सर्जन कमी करण्याबरोबर नवीनीकरणीय ऊर्जा वापरास प्रयत्न केल्याबद्दल गुजरात मधील राजकोट या शहराला नॅशनल अर्थ अवर कॅपिटल हा पुरस्कार घोषित केला आहे.

* आयफा २०१६ चित्रपट पुरस्कारमध्ये सर्वोकृष्ट चित्रपट अभिनेता बाजीराव मस्तानी मधील रणवीर सिंग तर सर्वोकृष्ट अभिनेत्री पिकू चित्रपटातील दीपिका पदुकोण झाली.

* आयफा २०१६ मध्ये सर्वोकृष्ट लोकप्रिय चित्रपट हा बजरंगी भाईजान ठरला.

* MTCR - मिसाईल टेकनॉलॉजी कण्ट्रोल रेजिम या सदस्य गटात भारताचा समावेश झाला आहे. यामुळे जागतिक स्तरावरील निर्यात नियंत्रण गटात भारताचा समावेश झाला. यामुळे आता या आताची सदस्य संख्या ३५ झाली आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.