मंगळवार, १४ जून, २०१६

हरित क्रांती व सामाजिक आर्थिक बदल

हरित क्रांती व सामाजिक आर्थिक बदल 

* खाद्यान्य उत्पादनात वाढ - हरित क्रांतीमुले खाद्दान्य उत्पादनात वाढ करण्यात आली. भारत अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण झाला.

* अन्न धान्याच्या आयातीत घट हरित क्रांती यांच्यामुळे उत्पादनात वाढ झाल्यामुळे प्रगतीपथावर असलेल्या देशात अन्न आयात यांची घट झाली.

* ग्रामीण रोजगारात वाढ - हरित क्रांती याच्यामुळे शेतकरी दुबार तिबार पिके घेत असल्यामुळे ग्रामीण भागात वर्षभर रोजगार पुरेल इतका रोजगार उपलब्द झाला.

* पारंपारिक कृषीपद्धतीत बदल करून खते, कीटकनाशके, यांचा वापर करून शेती उत्पादन वाढले आहे.

हरित क्रांतीचे परीस्थितीकिय परिणाम 

* प्रादेशिक असमतोल - भारतात हरित क्रांती याचा प्रभाव देशातील पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, व गुजरात या विकसित राज्यात जास्त झाला. त्यामुळे प्रादेशिक असमतोल घडून आला.

* पिक उत्पन्नात असमानता - हरित क्रांतीचा प्रभाव मुख्यता गहू व तांदूळ या पिकावर पडलेला आहे. ज्वारी, बाजरी, मका, यांच्यावर प्रभाव पडला. त्यामुळे पिक उत्पादनात असमानता निर्माण झाली.

* रासायनिक व कीटकनाशक याच्यामुळे प्रदूषण समस्या निर्माण झाल्या आहेत. 

* मृदेच्या सुपिकतेचा ऱ्हास - वर्षनुवर्षे एकाच पिक पद्धती घेत असल्यामुळे सुपीक जमिनीचा ऱ्हास होत आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.