मंगळवार, २८ जून, २०१६

महाराष्ट्र : झलक

महाराष्ट्र : झलक

महाराष्ट्र - स्थान,स्थापना,विभाग 

* महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली.

* महाराष्ट्राचे कोकण, देश, मराठवाडा, विदर्भ हे चार प्रादेशिक विभाग आहेत.

* महाराष्ट्राचे स्थान पश्चिम भारतात असून अक्षांश १५.८ उत्तर ते २२.१ उत्तर, तर रेखांश ७२.६ पूर्व तर ८०.९ पूर्व आहे.

* महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस - दादरा नगर हवेली, व गुजरात, उत्तरेस - मध्य प्रदेश, पूर्वेस - छत्तीसगड, आग्नेयेस - आंध्रप्रदेश, आणि दक्षिणेस - कर्नाटक व गोवा आहेत.

महाराष्ट्र - प्रशासकीय विभाग - जिल्हे [६]

१] कोकण विभाग - मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग

२] नाशिक विभाग - नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर

३] पुणे विभाग - पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा

४] औरंगाबाद विभाग - औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर

५] अमरावती विभाग - अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम

६] नागपूर विभाग - नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली

महाराष्ट्र प्राकृतिक 

* महाराष्ट्रच्या पश्चिमेस अरबी समुद्र पूर्वेस सह्यांद्री पर्वत, उत्तरेस सातपुडा पर्वत, आहे.

* महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे हे अहमदनगर व नाशिक या जिल्यात असून त्याची उंची १६४६ मी आहे.

* महाराष्ट्रात सुमारे ९०% भूभाग हा बेसॉल्ट म्हणजेच अग्नीजन्य खडकांनी बनलेला आहे.

* महाराष्ट्रात महाबळेश्वर, तोरणमाळ, चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे आहेत.

* महाराष्ट्रात काळी कापसाची रेगूर मृदा ही सर्वात जास्त असून तिची सुपीकता अधिक आहे.

महाराष्ट्रातील धरणे

धरण - नदी - जिल्हा  

१] भंडारदरा - प्रवरा - अहमदनगर
२] कोयना - कोयना - सातारा
३] भाटघर - येळवंडी - पुणे
४] धोम - कृष्णा - सातारा
५] पानशेत - अंबी - पुणे
६] जायकवाडी - गोदावरी - औरंगाबाद
७] खडकवासला - मुठा - पुणे
८] बिंदुसरा - बिंदुसरा - बीड
९] मुळशी - मुळा - पुणे
१०] तानसा - तानसा - ठाणे
११] गंगापूर - गोदावरी - नाशिक
१२] मोडकसागर - वैतरणा - ठाणे
१३] चाणकपूर - गिरणा - नाशिक
१४] तोतलाडोह - पेंच - नागपूर
१५] राधानगरी - भोगावती - कोल्हापूर
१६] दारणा - दारणा - नाशिक
१७] येलदरी - पूर्णा - हिंगोली
१८] सिद्धेश्वर - पूर्णा - हिंगोली
१९] उजनी - भीमा - सोलापूर
२०] वीर - नीरा - पुणे

महाराष्ट्रतील - नदीकाठची शहरे 

* गोदावरी - नाशिक, पैठण, नांदेड, कोपरगाव, आपेगाव

* कृष्णा - वाई, कराड, सांगली, औदुंबर

* भीमा - पंढरपूर

* इंद्रायणी - देहू, आळंदी

* मुळा मुठा - पुणे

* प्रवरा - संगमनेर, नेवासे

* पंचगंगा - कोल्हापूर

* तापी - भुसावळ

* सीना - अहमदनगर

* कऱ्हा - जेजुरी

महाराष्ट्र - विकास महामंडळ

* महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ - १९९६
* विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ - १९९७
* तापी पाटबंधारे विकास महामंडळ - १९९७
* कोकण पाटबंधारे विकास महामंडळ - १९९७
* गोदावरी - मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ - १९९८

महाराष्ट्र - कृषी संशोधन संस्था 

* राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र - मांजरी पुणे

* हळद संशोधन केंद्र - डिग्रज सांगली

* गहू संशोधन केंद्र - महाबळेश्वर सातारा

* गवत संशोधन केंद्र - पालघर ठाणे

* सेंटर फॉर इंडियन बांबू रिसर्च अँड टेक्नॉलॉजी - कुडाळ सिंधुदुर्ग

* राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र - हिरज केगाव सोलापूर

* राष्ट्रीय कांदा लसूण केंद्र - राजगुरूनगर पुणे

* फळ प्रक्रिया संशोधन केंद्र - पालघर

महाराष्ट्रातील - राष्ट्रीय महामार्ग

* राष्ट्रीय महामार्ग क्र ३ - मुंबई - नाशिक - आग्रा  

* राष्ट्रीय महामार्ग क्र ४ - मुंबई - ठाणे - पुणे - बेंगळुरू - चेन्नई

* राष्ट्रीय महामार्ग क्र ६ - सुरत - धुळे - नागपूर - रायपूर - संबळपूर - कोलकाता

* राष्ट्रीय महामार्ग क्र ७ - वाराणसी - रेवा - जबलपूर - नागपूर - हैद्राबाद - सालेम - मदुराई - कन्याकुमारी

* राष्ट्रीय महामार्ग क्र ८ - दिल्ली - जयपूर - अजमेर - उदयपूर - अहमदाबाद - मुंबई

* राष्ट्रीय महामार्ग क्र ९ - पुणे - सोलापूर - हैदराबाद - विजयवाडा

* राष्ट्रीय महामार्ग क्र १३ - सोलापूर - विजापूर - चित्रदुर्ग

* राष्ट्रीय महामार्ग क्र १६ - निजामाबाद - गदग

* राष्ट्रीय महामार्ग क्र ४ ब - पळस्पे - न्हावा - शेवा

* राष्ट्रीय महामार्ग क्र ५० - पुणे - नाशिक

* राष्ट्रीय महामार्ग क्र २०४ - रत्नागिरी - कोल्हापूर

* राष्ट्रीय महामार्ग क्र २११ - सोलापूर धुळे

महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे 

* अष्टविनायक - थेऊर - चिंतामणी पुणे, रांजणगाव - पुणे, मोरगाव - पुणे, ओझर - पुणे, लेन्याद्री - पुणे, सिद्धटेक - अहमदनगर, महाड - रायगड, पाली - बल्लाळेश्वर - रायगड,

* ज्योतिर्लिंगे - त्रयंबकेश्वर - नाशिक, भीमाशंकर - पुणे, घृष्णेश्वर - औरंगाबाद, परळी वैजनाथ - बीड, औंढा नागनाथ - हिंगोली,

* देवस्थाने - तुळजाभवानी - तुळजापूर, महालक्ष्मी - कोल्हापूर, माहूर [रेणुकादेवी] - नांदेड, अंबेजोगाई - योगेश्वरी - बीड, वणी सप्तशृंगी - नाशिक,

महाराष्ट्र : समाज 

महाराष्ट्र ग्रामीण व नागरी समाज 

* बलुतेदार पद्धत - पारंपरिक ग्रामीण समाजात ब्लेतेदारी पद्धती होती. यानुसार शेतकऱ्यांची अधिक महत्वाची कामे करणाऱ्या व त्यांच्या नित्याच्या गरजा भागविणाऱ्या बिगर शेती व्यावसायिकांना बलुतेदार पद्धत असे म्हणतात.

* चौगुला, महार, सुतार, लोहार, कुंभार, चांभार, न्हावी, सोनार, जोशी, परीट, गुरव, कोळी हे ते समाज होते.

* अलेतुदारी पद्धत - शेतकऱ्यांच्या नैमित्तिक गरजा भागविणाऱ्या बिगर शेती व्यावसायिकांना अलुतेदारी पद्धत असे म्हणतात.

* तेली, तांबोळी, साळी, सनगर, माळी, शिंपी, गोंधळी, भाट, डवऱ्या, ठाकर, गोसावी, मुलान, वाजंत्री, घडकी, कलावंत, तराळ, कोरव, भोई, यांना म्हणत.

 
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.