बुधवार, १ जून, २०१६

अपारंपरिक उर्जास्त्रोत - सौर उर्जा

१.४ अपारंपरिक उर्जास्त्रोत 

सौर उर्जा 

* सूर्यापासून मिळणारी उर्जा [ भू - औष्णिक आणि अणुउर्जा वगळता ] हीच एकमेव सर्व प्रकारची उर्जा मिळवून देणारी साधनसंपत्ती आहे.

* स्वयंप्रकाशित असलेल्या सूर्याच्या पृष्ठभागांचे तापमान अंदाजे ५,७६२ डी केल्विन आहे, त्यामुळे तो सतत प्रकाशकिरण बाहेर फेकत असतो.

* सौर उर्जा रुपांतर उष्णतारुपी उर्जेत होणे जरुरीचे असते. सौर उर्जेचे रुपांतर उर्जेच्या जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी त्यासाठी सिलिकॉन सोलर सेल म्हणतात.

* सिलीकॉन सोलर सेलच्या सहाय्याने सौर उर्जेचे रुपांतर विद्युत उर्जेत होते या क्रियेला फोटोव्होल्टाइट इफेक्ट म्हणतात.

* सौर ऊर्जेपासून इथेनॉल, हायड्रोजन इत्यादी प्रकारची उर्जा निर्माण करता येत नाही, हायड्रोजन ही भविष्यकाळात महत्वाची उर्जा ठरणार आहे.

* सौर उर्जा तीन प्रकारात प्राप्त करता येते सुर्यप्रकाशातील उष्णतेचा उपयोग करणे, सौर उर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रुपांतर करणे. जैविक प्रक्रियेतून किंवा प्रकाशसंश्लेषणातून उर्जा प्राप्त करणे.

* सौर चूल बहिर्गोल भिंगाच्या आधारे सूर्यकिरण एकत्रित करून त्यांची औष्णिक शक्ती वाढविता येते. सौर चुलीप्रमाणे अतिशय मोठा प्रकार म्हणजे सौरभट्टी होय.

* सौर भट्टीच्या सर्व बाजूनी भिंगे बसवलेली असतात. वस्तू उबदार ठेवण्यासाठी वस्तूच्या गच्चीवर दक्षिणेकडे तोंड करून  आरसे बसवितात.

* विद्युत उर्जेचा उपयोग करून शीतकरण केले जाते, या विशिष्ट पद्धतीत विद्युत उर्जेपैकी सौर उर्जा उपयोगात आणतात.

* सौर पट्ट्या उपयोगात आणून सौर उर्जेचे विद्युत उर्जेचे परस्पर रुपांतर करणे.

सौर चूल 

* बहिर्गोल भिंगाच्या आधारे सूर्यकिरण एकत्रित करून त्यांची औष्णिक शक्ती वाढविता येते. त्यात पॉलीश केलेली काच दिसावी त्याप्रमाणे किंवा अल्युमिनीअमचा पातळ थर असलेले प्लास्टिक भिंग म्हणून सौर चुलीत उपयोगात आणले जातात.

* सौर भट्टीच्या सर्व बाजूंना भिंगे बसवलेली असतात. अलीकडे काही प्रकारच्या सौर चुलीमध्ये गोलाकार आरसे बसवली असतात.

* सौर ऊर्जेपासून विद्युत उर्जा प्राप्त करता येते त्याच प्रक्रियेला सौर औष्णिक विद्युत केंद्र असे संबोधतात.

पवन उर्जा 

* पवन किंवा वारा म्हणजे हवेतील कणांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची क्रिया होय. यामध्ये गतिज उर्जा असते. त्यालाच पवन उर्जा असे संबोधतो.

* पवन उर्जेची निर्मिती प्रामुख्याने सौर उर्जेच्या अप्रत्यक्ष रूपांतराने होत असतो. सूर्यकिरनांचा प्रभाव जसा जमिनीवर होतो तसा समुद्रावरही होतो.

* कोणत्याही प्रकारच्या पवनचक्कीपासून मिळणारी शक्ती ही तिच्या पात्याची लांबी, वायूचा वेग आणि हवेच्या घनतेवर अवलंबून येते.

जैववायू 

* जैववायू किंवा नैसर्गिक वायू उत्तम स्वछ दहन इंधन आहे. त्या जैववायूचा उपयोग दैनदिन जीवनात जळण म्हणून स्वयंपाकासाठी, हवा पाणी तापवण्यासाठी, कृषीयंत्रे सुरु करून ऊर्जानिर्मिती, पाणी उपसा करण्यासाठी केला जातो.

* जैव वस्तुमानापासून प्राप्त होणारा जैव इंधने  नवीनीकरण योग्य उर्जास्त्रोत आहे. जैववायू, इथेनॉल, जैव डिझेल इत्यादी म्हणून प्रसिद्ध आहे.

* पूर्वीच्या रशियात नैसर्गिक वायूचा साठा मोठा असून  टक्केवारी ३५.७ आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मध्यपूर्व आशिया आहे त्यात ३३.८% साठा आहे.

* नैसर्गिक वायूचा मोठा साठा हा मिथेन असून [ CH - 4 ] वायूचा आहे.

जैविक उर्जा 

* जनावरांचे शेन, मलमूत्र आणि अन्य सेंद्रिय पदार्थ यांचे विशिष्ट प्रकारच्या हवाबंद टाकीमध्ये कुजवून, बक्टेरीया, यांचे विघटन होऊन विशिष्ट पदार्थ बाहेर पडतो तो म्हणजे जैववायू आहे.

* मिथेन आणि कार्बाम्ल वायू म्हणजे विशिष्ट वायू आहे. जैविक वायूचा उपयोग अन्न शिजवण्यासाठी, डीझेल इंजिनसाठी, प्रकाशदिव्यासाठी, स्वयपाकासासाठी, होत असतो.

* जैविक उर्जा हि अत्यावश्यक स्वरुपाची उर्जा ठरली असून त्या जैविक उर्जा पदार्थामध्ये प्रामुख्याने कर्बवायू, हायड्रोजन वायू आणि प्राणवायू ही मूलद्रव्ये आहेत.

सागरी उर्जा 

* ज्या ठिकाणी नदी समुद्राला मिळते व समुद्राचे पाणी अरुंद चिंचोळ्या भागात वाहते अशा ठिकाणी हि शक्यता असते. सूर्य, पृथ्वी, चंद्र, यांच्या परस्परातील आकर्षण बळामुळे सागरात उर्जा साठविली जाते.

* सागरी उर्जा मुख्यत्वे करून पुढील प्रकारात मिळविता येते सागरी तापमान उर्जा रुपांतर, सागरी तरंग लहरी, सागरी भारती ओहोटी या प्रकारात हि उर्जा मिळविली जाते.

* ओहोटीच्या वेळी खाडीत साठविलेले पाणी बंधाराच्या अरुंद दरवाज्याकडून सोडले जाते. व त्यावरही टर्बाईनच्या सहाय्याने विद्युत जनित्र फिरवून वीजनिर्मिती केली जाते.


भूऔष्णिक उर्जा 

* पृथ्वीच्या आत सुमारे ३२ किलोमीटरवर जास्त तापमानामुळे पदार्थ द्रवरूप अवस्थेत असते. त्यालाच आपण भौगोलिक भाषेत म्याग्मा असे म्हणतात.

* बऱ्याच वेळा पृष्ठभागावरील पाणी पृथ्वीच्या कवचाला काही ठिकाणी तडे गेल्यामुळे किंवा झिरपून आत खोलवर प्रवेश करते. त्या ठिकाणी वाफेच्या रुपात तप्त खडकाच्या वरच्या भागात उष्णता साठते.

* त्याला रिझरवायर असे संबोधतात या रिझरवायर मधील उष्णता आपणास उष्णता उर्जा म्हणून उपयोगात आणता येते. हीच भूगर्भीय औष्णिक उर्जा होय.






 


















  



























0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.