रविवार, १५ मे, २०१६

विद्यापीठ अनुदान आयोग [ UGC ]

१.६.३ विद्यापीठ अनुदान आयोग [ UGC ] 

* १९४४ साली नियुक्त करण्यात आलेल्या सार्जंट समितीच्या अहवालाप्रमाणे विद्यापीठ अनुदान समिती स्थापन करण्याची सूचना केली होती.

* १९५२ साली असा निर्णय घेण्यात आला कि उच्च शिक्षणाला देण्यात येणारा निधी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे सोपविण्यात आला.

* या आधारे १९५३ साली मौलाना आझाद यांच्या हस्ते विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना करण्यात आली.

* १९५६ साली वैधानिकरित्या संसदेच्या कायद्यातून विद्यापीठ अनुदान आयोग स्थापन करण्यात आले.

प्रादेशिक केंद्रे 

* विद्यापीठ अनुदान आयोगाचे विकेंद्रित पद्धतीने चालते आणि त्यासाठी ६ प्रादेशिक केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये पुणे, हैद्राबाद, कोलकाता, भोपाळ, मोहाली, आणि बंगळूरू येथे असून मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे.

आयोगाची कार्ये 

* विद्यापीठ स्तरावरील शिक्षणाला चालना देणे आणि त्यामध्ये समन्वय साधने.

* विद्यापीठ स्तरावरील शिक्षण, संशोधन व परीक्षा यामध्ये गुणवत्ता टिकविणे.

* शिक्षणाच्या किमान दर्जाचे नियमन करणे

* विद्यापीठ शिक्षणाचा विकास होण्यासाठी विद्यापीठे आणि महाविद्यालये यांना अनुदान देने.

* उच्च शिक्षणातील इतर संस्था व शासन यांच्यातील महत्वाचा सेतू म्हणून कार्य करणे.

* केंद्र व राज्यशासनाला उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी सल्ला व सूचना देणे.

* संशोधनासाठी दिली जाणारी मदत हि लघु प्रकल्प व मोठे प्रकल्प अशा दोन गटामध्ये दिली जाते.

* पदव्युत्तर संशोधनासाठी आता एम. फील. पीएच डी विद्यार्त्यांना शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली. 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.