सोमवार, २३ मे, २०१६

उच्च शिक्षण आणि राष्ट्रीय आयोग - NCHER

२.१०.१२ उच्च शिक्षण आणि राष्ट्रीय आयोग [ National Commission for Higher Education and Reasearch NCHER ] 

* उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात विविध संस्थांतर्गत समन्वय निर्माण करणे, त्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे आणि त्याची स्वायत्ता वाढविणे यासाठी सध्याची यंत्रणा अपुरी पडत असल्याने नव्या [ राष्ट्रीय उच्च शिक्षण आयोग ] स्थापनेचा निर्णय घेतला आहे.

रचना 

* या आयोगावर अध्यक्ष व सहा सद्यस्य राहणार असून त्यांची मुदत ५ वर्षे राहणार आहे.

* आयोगातील निर्णय प्रक्रिया लोकशाही पद्धतीची असून प्रत्येक सदस्यास एक मत असते.

* एखाद्या मुद्यावर ५०% सदस्याचे नकारात्मक मत असल्यास ते नाकारले जाते.

* आयोगाला निवडणूक आयोगाचा दर्जा असून दिवाणी न्यायालयाने अधिकार देण्यात आले आहे.

कार्ये आणि अधिकार 

* उच्च शिक्षण देणाऱ्या विविध संस्थामधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे तसेच विविध संस्थामध्ये समन्वय साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे.

* विद्यापीठे तसेच उच्च शिक्षणसंस्थांना पदवी देण्याचा अधिकार देणे.

* राष्ट्रीय गरजा व प्राधान्यक्रम यानुसार राष्ट्रीय अभ्यासक्रम तयार करणे.

* उच्च शिक्षणाचे गुणवत्ता निकष निर्धारित करणे.

* विद्यापीठ व उच्च शिक्षणसंस्थांचे मानांकन करणे.

* विद्यापीठ व शैक्षणिक संस्थाकरिता आदर्श कार्यप्रणाली निर्धारित करणे.

* विद्यापीठे व शैक्षणिक संस्थाकारीता अनुदान निकष ठरविणे.

* वार्षिक अहवाल तयार करणे.

* शैक्षणिक खर्चाचे निर्धारण व प्रतीविद्यार्थी खर्चाचे प्रमाण यांचे मुल्यांकन करणे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.