रविवार, २२ मे, २०१६

एन. आय. टी [ National Institute of Technology ]

२.१०.९ एन. आय. टी [ National Institute of Technology ]

* शास्त्र आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारत अग्रेसर व्हावा या दृष्टीने पं जवाहरलाल नेहरू प्रयत्नशील होते. 

* सन १९५९ ते १९६५ दरम्यान १४ प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालये सुरु केली.

* २००२ साली मुरली मनोहर जोशी व तत्कालीन मनुष्यबळ विकासमंत्री यांनी प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयांना " राष्ट्रीय अभियांत्रिकी महाविद्यालयांचा " दर्जा देण्यात आला.

* निट कायदा  -  राष्ट्रीय तंत्रसंस्था निट कायदा [ २००७ ] साली पास करण्यात आला.

प्रशासन 

* राष्ट्रीय पातळीवर सर्व निटचे मिळून बोर्ड ऑफ कौन्सिल असते. हे कौन्सिल मा राष्ट्रपतीच्या अधिपत्याखाली असते. सर्व निटचे संचालक व अध्यक्ष, यु जी सी अध्यक्ष, एआयसीटीसीचे प्रतिनिधी, मानव संसाधन मंत्रालयाचे सहसचिव सदस्य असतात.

* निटच्या संचालक मंडळामध्ये भारत सरकार नियुक्त अध्यक्ष, निटचे संचालक, मानवसंसाधन मंत्रालयामार्फत नियुक्त प्रतिनिधी, संबधित राज्याचा उच्च तंत्रशिक्षण विभागाचा प्रतिनिधी, आयआयटी संचालक\प्रतिनिधी उद्योगाचे दोन प्रतिनिधी असे सद्यस्य संचालक मंडळात असतात.

प्रवेश 

* यासाठी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

* प्रवेशासाठी ५०% विद्यार्थी संबधित राज्यातील व ५०% अखिल भारतीय स्तरावर निवडले जातात.

* या संस्थेत २७% ओबीसी, १५% एससी, ७.५% एसटी, करिता आहे.

* या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी [ AIEEE ] अखिल भारतीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा आहे.


 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.