बुधवार, ४ मे, २०१६

Figures of Speech [ भाषेचे अलंकार ]

Figures of Speech [ भाषेचे अलंकार ]

* अलंकार म्हणजे सौंदर्यात भर घालणारी साधने. जसे माणूस आपले सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर करतो त्याचप्रमाणे भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या तंत्राला भाषेचे अलंकार असे म्हणतात.

१] Simile [ उपमा ] - एखाद्या बाबतीत तरी साम्य असणाऱ्या दोन भिन्न गोष्टीत तुलना केली जाते. सर्वसाधारणपणे अशा वाक्यात like, as, so अशा तुलनात्मक शब्दाचा वापर केला जातो.
eg - [ Suresh is as strong as Ramesh. ], [ It is as clear as crystal. ]

2] Metaphor [ रूपक ] - एखाद्या घटकाशी तुलना न करता प्रत्यक्षात त्या घटकाला दुसऱ्याचे रूप देणे म्हणजे रूपक अलंकार होय. यात So, As, Like या सारख्या तुलनात्मक शब्दाचा वापर केलेला नसतो.
eg - [ Clouds of doubts. ], [ The dark serpent ]

3] Personification [ चेतनागुणोक्ती ] - या अलंकारात निर्जीव घटक किंवा अमूर्त कल्पना [भाववाचक नामे] मानवाप्रमाणे किंवा सजीवाप्रमाणे कृती करतात असे दर्शविले जाते.
eg - [ Death lays his icy hands on the king ] [ The city gose on growing ]

4] Allitaration [ अनुप्रास ] - एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा तिथे अनुप्रास हा अलंकार होतो.
eg - [ I want to sow seeds of moon ] [ Controlled and cleanly night and day ]

5] Reapetition [ पुनरावृत्ती ] - एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती केलेली असते.
eg - [ Keep fit, little man, keep fit! ], [ On your toes, little man, just smile!

6] Antithesis [ विरोधालंकर ] - दोन विरोधी कल्पना किंवा शब्दांचे एकाच वाक्यात सादरीकरण केलेले असते.
eg - [ Many proposes, God disposes ], [ And whether the game you lose your win.]

7] Climax [ रसोत्कर्षलंकार ] - वाक्यातील कल्पना महत्व क्रमानुसार चढत्या क्रमाने मांडलेल्या असतात.
eg - [ Land of our birth, our faith, our pride. ] [Great wide, beautiful, wonderful, world.]

8] Inversion - [व्युत्क्रम] - शब्दाचा क्रम नियमित गद्यक्रमानुसार न ठेवता तो उलट ठेवला जातो.
eg - [ Blue as the wings of a halcyon wild.....] [ Death, be not proud.]

9] Hyperbole [ अतिशयोक्ती ] - कोणतीही कल्पना आहे, त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, त्या वेळी अतिशयोक्ती हा अलंकार होतो.
eg - [ She wept oceans of tears. ] [ Her love knows no bounds. ]

10] Irony [ व्याजस्तुती\उपरोध ] - बाहेरून स्तुती परंतु आतून निंदा किंवा बाह्यत: निंदा आतून स्तुती किंवा उपहास व्यक्त करण्यासाठी दोन विरुद्ध कल्पनांचा एका वाक्यात वापर केलेला असतो.
eg - [ They call me Indian abroad but in my own land I dont know who I am ]

11] Apostrophe [ परोक्ष ] - मृत, अनुपस्थितीत किंवा मानवीकृत कल्पना यांना प्रत्यक्ष मानून, संबोधून बोलले जाते.
eg - [Death, be not proud.] [World, you are beatiful drest.]

12] Rhymes [ यमक ] - ओळीतील शेवटच्या शब्दातील अक्षरांचे उच्चार जुळतात, त्यामुळे एक ताल निर्माण होतो, तेव्हा यमक हा अलंकार होतो.
eg - [ Your hearts, fire and snow.]

13] Paradox [ विरोधाभास ] - विरोधाचा आभास निर्माण करण्यासाठी दोन विरुद्ध कल्पना मांडल्या जातात.
eg - [ Your heart, fire and snow. ]

14] Tautlogy [ शब्दालंकार ] - एखादी कल्पना स्पष्ट करण्यासाठी अनावश्यक शब्दाचा वापर केला जातो.
eg - This is our heritage, our heirloom.

15] Onomatopoia [ ध्वनी ] - वाक्यात आवाज किंवा ध्वनीदर्शक शब्द वापरलेले असतात.
eg - [The crowl will hoot.]

16] Pun [ श्लेष अलंकार ] एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरला जातो तेव्हा जी शब्दावृत्ती साधली जाते तिला श्लेष अलंकार म्हणतात.
eg - [Now my house as also moved into a flat, I too a flat and I too have become some what flat] 

17] Transferred Epithet [ परावर्तीत गुणविशेष अलंकार ] - विशिष्ट शब्दाचा गुणविशेष दुसऱ्या शब्दाला बहाल केला जातो.
eg - [The cloudy summits of our time.]

18] Metonymy [ अजहल्लक्षणा ] - एखाद्या गोष्टीला सामन्यात: तिच्याशी संबंधित असणाऱ्या घटकाचे नाव देणे.
eg - [ I have read shakespeare.]

19] Anticlimax [ प्रतिसार अलंकार ] - महत्व क्रमानुसार कल्पना उतरत्या क्रमाने मांडल्या जातात.
eg - [ I die, I faint, I fall ]

20] Synecdoche [ निर्देशक अलंकार ] - एखाद्या घटकाचा वापर संपूर्ण समूहाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी  किंवा एखाद्या घटकाचा निर्देश करण्यासाठी जातो तेव्हा निर्देशीत अलंकार होतो.
eg - [ All the worlds belies are fed by her ]

21] Litotes [ उनोक्ती ] - नकारदर्शक वाक्याने होकारार्थ सुचविला जातो.
eg - [I am not little surprised.]

22] Ephemism [ मृद पर्यायोक्त ] - या अलंकारातून कडू अर्थ गोड शब्दांनी किंवा अप्रिय गोष्ट सौम्य शब्दांत व्यक्त केली जाते.
eg - [ We lie with transed breath.]

23] Interrogation [ प्रश्नालंकार ] - या अलंकारात दिलेल्या प्रश्नातच त्याचे उत्तर सामावलेले असते.
eg - [Nobody knows who am I]

24] Exclamation [ उद्गारवाचक अलंकार ] - या अलंकारात उत्स्फूर्त भावना व्यक्त करण्यासाठी उद्गारवाचक वाक्याचा\शब्दाचा वापर केलेला असतो.
eg - [Ah! you will miss us, right well we know]

25] Allegory [ दृष्टांत अलंकार ] - एखादी घटना पटवून सांगण्यासाठी दृष्टांत किंवा उदाहरण सांगितले जाते.
eg - [ Siddhartha and the hawk.]0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.