बुधवार, ११ मे, २०१६

उच्च जननदराची सामाजिक कारणे

१.१.५ उच्च जननदराची सामाजिक कारणे 

* विवाहाचे अल्प वय - एन. सी. दास  यांनी केलेल्या अभ्यासावरून असे स्पष्ट झाले आहे कि विवाहाचे अल्प वय हे उच्च जननदराचे महत्वाचे कारण आहे. लहान वयात विवाह झाल्याने पुनरुत्पादन कालावधी वाढतो. जर विवाह २५ वर्षानंतर झाला तर जननदर कमी राहतो. परंतु भारतात अद्यापि स्त्रियांचे विवाह वय सरासरी १८ वर्षे आहे.

* अंधश्रद्धा - कुलदीपक मुलगाच हवा, त्यामुळेच मुक्ती मिळते अशा अंधश्रधेंणे  मुली कितीहि झाल्या तरीही मुलगाच हवा यासाठी आग्रह धरला जातो. तसेच प्रत्येकाने विवाह केलाच पाहिजे, या सामाजिक आग्रहाने लोकसंख्या वाढते.

* संयुक्त कुटुंबपद्धती - अद्यापही ग्रामीण भागात संयुक्त कुटुंबपद्धती मोठ्या प्रमाणात दिसते. मुले सांभाळण्याची आर्थिक कुवत नसली तरीही एकत्र कुटुंब पद्धतीने हि बाब दुर्लक्षित होते. मुलाचा खर्च, सांभाळ एकत्रित कुटुंबात सहजरित्या होत असल्याने मोठ्या आकाराच्या कुटुंबास प्रोत्साहन मिळते. विभक्त कुटुंब पद्धतीत मुलाची जबाबदारी व खर्च त्या संबधित पती - पत्नीलाच उचलावी लागते. त्यामुळे ते आपला भार मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतात.

* स्त्री-शिक्षणाचे अल्प प्रमाण - भारतात अद्यापही निरक्षरतेचे प्रमाण मोठे आहे. त्यातही स्त्री शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे. अमर्त्य सेन यांनी असे स्पष्ट केले कि चीनमध्ये एक मुल धोरणाने जेवढा जननदर कमी केला तेवढाच परिणाम केरळमध्ये स्त्री साक्षरतेच्या प्रमाणातील वाढीने घटल्याने दिसते. स्त्री शिक्षणाच्या प्रसाराबरोबर स्त्रीचा सामाजिक दर्जा वाढतो आणि कुटुंबात मुलांची संख्या मर्यादित होते. भारतात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, व राजस्थानच्या येथे स्त्री साक्षरतेचे प्रमाण कमी असून तेथे जननदर अधिक असल्याचे दिसते.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.