बुधवार, १८ मे, २०१६

वंचित किंवा विशिष्ट गटाचे शिक्षण

२.४ वंचित किंवा विशिष्ट गटाचे शिक्षण

२.४.१ मुलींचे शिक्षण - महत्व व समस्या 

* एकूण लोकसंख्येमध्ये स्त्रियांचे प्रमाण ५०% असले तरीही सर्व स्तरावरील स्त्रियांवर शिक्षणाबाबत अन्याय झालेला दिसतो.

* जर स्त्री शिकली तर मुख्यत्वे मानवी भांडवल समृद्ध होईल. तसेच एकूण सामाजिक व्यक्तिमत्व स्त्री-शिक्षणातून वृद्धिगत होईल.

* सामाजिक दृष्टीकोन - भारतीय समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान दिलेले आहे. परिणामी शिक्षणातही त्यांना दुय्यम स्थान दिले आहे.

* कौटुंबिक कामे असल्याने बऱ्याच स्त्रिया शिक्षणास वेळ देवू शकत नाहीत.

* बालविवाह या प्रथेमुळे लवकर लग्न झालेल्या मुलीला घरची जबाबदारी असल्यमुळे शिकायला मिळत नाही.

* मुला-मुलींच्या एकत्रित शिक्षणास अद्यापि काही पालकांचा विरोध नाही.

* दारिद्रयामुळे असल्यामुळे मुलीना शिक्षण शिकविल्या जात नाही.

शासकीय उपक्रम

* मध्यांत भोजन योजनेचा परिणाम मुलांपेक्षा मुलींच्या शिक्षणावर अधिक अनुकूल झालेला दिसतो.

* सामाजिक प्रबोधन जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.

* मुलींना १२ वी पर्यंतच्या शिक्षण फीमध्ये सवलत दिली आहे.

* कपडे, वह्या, पुस्तके मोफत दिली जातात.

* गरीब पालकांना उपस्थिती भत्ता सुरु केला आहे.

* सावित्रीबाई फुले दत्तक योजना राबविली जात आहे.

* मुलीकरिता स्वतंत्र तंत्रनिकेतने स्थापन केली जातात.

* शिष्यवृत्त्या खास मुलीसाठी दिल्या जातात.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.