सोमवार, २३ मे, २०१६

व्यावसायिक शिक्षण हे मानवी संसाधनाचे साधन

३ व्यावसायिक शिक्षण 

३.१ व्यावसायिक शिक्षण हे मानवी संसाधनाचे साधन 

३.१.१ व्यावसायिक शिक्षण - संकल्पना व स्वरूप 

* व्यावसायिक शिक्षण म्हणजे कामगारांचे शिक्षण किंवा प्रशिक्षण होय.

* व्यावसायिक शिक्षण म्हणजे शारीरिक कष्टाच्या कामाचे शिक्षण होय.

* कौशल्यकेंद्रित शिक्षण म्हणजे व्यावसायिक शिक्षण होय.

* सामाजिकदृष्ट्या उत्पादक ठरणारे शिक्षण म्हणजे व्यावसायिक शिक्षण होय.

३.१.२ व्यावसायिक शिक्षणाची तत्वे 

* व्यावसायिक शिक्षण जेथे दिले जाते तेथील वातावरण हे कामगार प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जेथे कामावर जातो, तेथील वातावरणाप्रमाणे असावे. त्यामुळे प्रशिक्षण व वापर यातील अंतर किमान राहते.

* प्रशिक्षणाच्या ठिकाणी वापरली जाणारी साधने व यंत्रे आधुनिक असली पाहिजेत.

* प्रत्येकाच्या आवडी - निवडी, क्षमता व कल यानुसार प्रशिक्षण दिले पाहिजे.

* व्यावसायिक शिक्षण देणारा शिक्षक प्रशिक्षित असणे आवश्यक आहे. त्या उद्योग क्षेत्रातील बदलांचे पूर्ण ज्ञान त्यांच्याकडे असले पाहिजे.

* श्रम बाजाराच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते बदल अभ्यासक्रमात केले पाहिजेत.

* प्रत्येक कार्यासाठी किमान कौशल्याची आवशक्यता असते. ती प्रथम पूर्ण करणे हे व्यावसायिक शिक्षणापासून साध्य झाले पाहिजे.

* व्यावसायिक शिक्षण लवचिक असले पाहिजे. बदलत्या कौशल्याची मागणी त्यातून पूर्ण होते.




















0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.