रविवार, २२ मे, २०१६

आय. आय. एम - भारतीय व्यवस्थापन संस्था

२.१०.१० आय. आय. एम - भारतीय व्यवस्थापन संस्था [ IIM ]  

* उद्योगधंद्यांना आवश्यक असणारे व्यवस्थापकीय कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे कार्य आय. आय. एम मार्फत जाते.

* जागतिक दर्जाचे व्यवस्थापक या संस्थेमधून निर्माण झाले आहेत. यासाठी पं जवाहरलाल नेहरू यांनी प्राथमिक प्रोत्साहन दिले.

* भारतातील पहिली आयआयएम १३ नोवेंबर १९६१ रोजी कलकत्ता येथे स्थापन झाली. तिचे कॅम्पस १३५ एकर परिसरात आहे.

* सर्वात अलीकडील आयआयएम हे उत्तराखंडमध्ये २०११ काशीपुर येथे स्थापन करण्यात आले.

प्रशासन 

* आय आय एम संस्था स्वायत्त असून स्वतंत्र कौन्सिल याकरिता आहे. कौन्सिल सर्व आयआयएमचे संचालक, मानव संसाधन मंत्रालय प्रतिनिधी असतात. याचे प्रमुख मानव संसाधानात मंत्री असतात.

प्रवेश प्रक्रिया 

* आयआयएमच्या २,७५० जगाकरिता कॅट किंवा कॉमन अडमिशन टेस्ट घेतली जाते.

* २००९ सालापासून अमेरिकन कंपनी प्रोमेट्रीक मार्फत संगणक आधारित चाचणी घेतली जाते.

* यामध्ये ४९.५ एवढ्या जागा राखीव स्वरूपाच्या असतात. विद्यार्थ्यांची आकलन क्षमता, विश्लेषण कौशल्य  नेतृत्व यांची चाचणी घेण्यासाठी गटचर्चा  वैयक्तिक परीक्षा घेतली जाते.

अभ्यासक्रमातील नाविन्य 

* भारतातील अहमदाबाद येथील आयआयएम यांचे हावर्ड बिसिनेस स्कुलसोबत सहकार्य होते व २०१०  साली द इकॉनॉमिचे दर्जेदार संस्थेमध्ये जागतिक क्रमवारीत ८५ व क्रमांक दिला आहे.

* बंगलोरच्या आयआयएम मधून सॉफ्टवेअर एंटरप्राईज पब्लिक पॉलिसी हा कोर्स चालविला जातो.

* लखनौ आयआयएम या संस्थेमधून [ Agri ] बिसनेस व्यवस्थापन हा कोर्स शिकविला जातो.

* कोझिकोडे येथील संस्थेने प्रथमच दूरशिक्षण पद्धतीने एम. बी. ए सुरु केले आहे.

* इंदोर येथे संरक्षण दलातील अधिकाऱ्यांना व्यवस्थापन प्रशिक्षण देणारी संस्था आहे.

भारतातील आयआयएम संस्था  

* IIM - कोलकाता - १९६१ पं बंगाल 
* IIM - अहमदाबाद - १९६१ गुजरात 
* IIM - बंगलोर - १९७३ कर्नाटक 
* IIM - लखनौ - १९८४ उत्तर प्रदेश 
* IIM - कोझिकोडे - १९९६ केरळ 
* IIM - इंदोर - १९९६ मध्य प्रदेश 
* IIM - शिलाँग - २००७ मेघालय 
* IIM - रोहतक - २०१० हरियाना 
* IIM - रांची - २०१० झारखंड 
* IIM - रायपुर - २०१० छत्तीसगढ 
* IIM - तीरुचीलापल्ली - २०११ तामिळनाडू 
* IIM - उदयपुर - २०११ राजस्थान 
* IIM - काशीपुर - २०११ उत्तराखंड 
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.