मंगळवार, ३१ मे, २०१६

ग्रामीण भागातील संरचनात्मक विकास

५.६  ग्रामीण भागातील संरचनात्मक विकास 

संरचनात्मक विकास - वीज 

* ८ ते ९% राष्ट्रीय उत्पन्न वाढेल असे गृहीत धरल्यास सन २०१७ पर्यंत भारतीय नागरिकाचे दरडोई उत्पन्न वास्तव स्वरुपात दुप्पट होईल.

* वीजक्षेत्राच्या बाबतीत विचार करता अकराव्या पंचवार्षिक योजनेत ८ ते ९% वृद्धीदर प्राप्त करण्यसाठी ६०,००० मेगावट इतकी जादा वीजनिर्मिती करावी लागते.

* नव्या विद्युत केंद्रासाठी कोळसा किंवा नैसर्गिक वायू पुरवठ्याची हमखास व्यवस्था करणे.

* विद्युतनिर्मिती साठी वापरले जाणारे इंधन ज्या राज्यात मिळते त्याना द्याव्या लागणाऱ्या रॉयल्टी संबधी राष्ट्रीय एकमत तयार करणे.

* दीर्घकालीन वित्तपुरवठा तयार करणे.

* केंद्रीय वीज केंद्रांना सध्या देण्यात येणारा कंटेनर परतावा दर कमी करून राज्यांचा वीज दर कमी करणे.

* आंतर विद्यूत वहनाची कार्यक्षम व पुरेशी व्यवस्था निर्माण करणे.

* विद्युत वाटपाची कार्यक्षम व्यवस्था निर्माण करून विद्युत पुरवठ्याच्या विस्ताराची सक्षम व्यवस्था करणे.

* औष्णिक विद्युत केंद्राचे पुनर्वसन करणे आणि त्यांचा प्लांट लोड वाढविणे.

* जलविद्युत केंद्राची क्षमता वाढविणे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.