सोमवार, २३ मे, २०१६

महाराष्ट्रातील व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण व्यवस्था

३.४ महाराष्ट्रातील व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण व्यवस्था 

तंत्रशिक्षण विभाग [DTE] 

* तंत्रशिक्षण विभाग १९४८ साली स्थापन करण्यात आला. हा विभाग स्थापन करण्यामागे तंत्रशिक्षण यामध्ये सुसूत्रता आणणे आणि नियंत्रित ठेवणे हे उदिष्ट होते.

* या संस्था आयआयटी मधील प्रशिक्षण, शासकीय औद्योगिक कामगार प्रशिक्षण, उच्च माध्यमिक स्तरावरील व्यावसायिक शिक्षण यावर नियंत्रित ठेवण्याचे कार्य करतात.

* १९८४ साली शासनाने तांत्रिक शिक्षणासाठी स्वतंत्रपणे व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचनालय स्थापण केले.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था  

* कारागीर प्रशिक्षणाची सुविधा आयआयटी किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत केली जाते.

* सध्या त्यांची संख्या १३१ असून त्यामध्ये ४१,२९२ विद्यार्थी प्रशिक्षण घेवू शकतात.

* १९९५ साली महाराष्ट्र शासनाने प्रत्येक तालुक्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला व स्थापन करण्याचा निर्णय घेतला व १९९८ साली १८१ नव्या संस्था उघडण्यात आल्या.

स्त्री शिक्षणास प्राधान्य  

* मुलींच्या तांत्रिक प्रशिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी १५ औद्योगिक प्रशिक्षण संस्था काढण्यात आल्या.

* माजी सैनिक व मागासवर्गीय यांना आरक्षण असून प्रवेशाची वयोमर्यादा १४ ते ४० वर्षे आहे.

प्रवेश नियम व सवलती 

* या संस्थेत गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जातो. दहावी उतीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो.

* माजी सैनिक आणि मागासवर्गीय यांना आरक्षण असून प्रवेशाची वयोमर्यादा १४ ते ४० वर्षे आहे.

अनौपचारिक व्यावसायिक प्रशिक्षण 

* आर्थिक विकासात कुशल मनुष्यबळाची गरज वाढत जाते. याची पूर्तता करण्यासाठी आयआयटी तसेच उच्च माध्यमिक स्तरावर औपचारिक शिक्षणाची सोय केली आहे.

* ज्याला आपल्या चरितार्थासाठी व्यवसाय कौशल्याचा प्रशिक्षणाची गरज आहे. अशा वर्गासाठी अनौपचारिक शिक्षणासाठी सोय केलेली असते.

प्रगत व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम [ AVTS ] 

* प्रगत प्रशिक्षणाच्या सुविधा निर्माण करणे.

* ज्या औद्योगिक कामगारांना पूर्वी प्रशिक्षणाचा लाभ घेत आला नाही त्यांना प्रशिक्षण उपलब्द करून देणे.

* आधुनिक व्यवसायाच्या नव्या कौशल्याच्या गरजा पूर्ण करणे.

* प्रशिक्षणात गुंतलेल्या अध्यापकांना प्रशिक्षण देणे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.