बुधवार, १८ मे, २०१६

शैक्षणिक धोरण

२.५ शैक्षणिक धोरण 

२.५.१ राधाकृष्णन आणि मुदलियार आयोग 

* १९४८ साली राधाकृष्णन आयोग नेमण्यात आला. उच्च शिक्षणासाठी माध्यमिक शिक्षणाची पुनर्रचना  करणे आवश्यक आहे. हि पुनर्रचना करण्यासाठी राधाकृष्णन आयोग नियुक्त करण्यात आला.

* १९५२ साली मुदलियार आयोग माध्यमिक शिक्षणासाठी नियुक्त करण्यात आला.

* शालेय शिक्षणाचा कालावधी हा १२ वर्षावरून ११ वर्षे करण्याची शिफारस करण्यात आली तसेच माध्यमिक शिक्षणाच्या परीक्षा विद्यापीठाकडून खास नव्या मंडळाकडे सोपविण्यात याव्यात.

* बहुद्देशीय म्हणजेच व्यावसायिक व तांत्रिक शाळा स्थापन कराव्यात अशीही महत्वाची शिफारस या आयोगाने केली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.