गुरुवार, १९ मे, २०१६

विधानसभा निवडणुका २०१६

विधानसभा निवडणुका निकाल २०१६ 

* १९ मे रोजी देशातील पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ, पुडुचेरी या राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित झाले.

* पश्चिम बंगाल मध्ये एकूण २९४ जागेपैकी तृणमूल काँग्रेस या पक्षाला २११ जागा, CPM-CPI या पक्षाला २७ जागा, भाजपला ३ जागा, काँग्रेसला ४४ जागा, तसेच इतर पक्षांना ९ जागा, मिळाल्या आहे. यामुळे तृणमूल काँग्रेस हा पक्ष बहुमताने विजयी झाला आहे. व ममता बनर्जी ह्या त्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत.

* तामिळनाडूच्या २३४ जागेपैकी AIDMK- म्हणजे मायावतीच्या पक्षाला १३४ जागा, DMK-काँग्रेस - या पक्षाला ९५ जागा, भाजपा-MDMK-PMK या पक्षाला एकही जागा प्राप्त झाली नाही. व इतर पक्षाला १ जागा प्राप्त झाली आहे.

* आसामच्या १२६ जागेपैकी भाजपला सर्वाधिक ६० जागा मिळाल्या, तर काँग्रेस २६, आसाम गण परिषद १४, AUDF- १३, इतर -१३ इतक्या जागा प्राप्त झाल्या. आसामच्या इतिहासात प्रथमच भाजपा बहुमताने विजयी झाले.

* केरळच्या १४० जागेपैकी CPM ला - ५८ जागा, काँग्रेस - २२ जागा, CPI - १९ जागा, भाजप - १ जागा, इतर - ४० जागा, मिळाल्या आहेत.

* पोंडेचेरीच्या ३० जागेपैकी काँग्रेसला १५ जागा, DMK- २ जागा, AIDMK - ४ जागा, इतर - ९ जागा प्राप्त झाल्या आहेत.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.