मंगळवार, १० मे, २०१६

उच्च जननदराची आर्थिक कारणे

१.१.४ उच्च जननदराची आर्थिक कारणे 

भारतीय लोकसंख्येत भर घालण्याचे कार्य उच्च जननदरामुळे होते. हा उच्च जननदर विविध रूढी, परंपरा मोठ्या कौटूबिक आकारचे आर्थिक फायदे, गरिबी अशा विविध घटकाचे एकत्रित फलित आहे. उच्च जननदरामागे पुढील आर्थिक घटक जबाबदार आहे.

* गरिबी - लोकसंख्या वाढत असल्याने दारिद्रय किंवा गरिबी वाढत आहे असा समज आहे. प्रत्यक्षात मात्र गरिबी हेच लोकसंख्या वाढीचे कारण असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. गरिबीमुळे एकाची भर पडली तरी आर्थिक परिस्थितीत फारसा प्रतिकूल बदल होत नाही. उलट भविष्यकाळात त्याकडून आर्थिक लाभ होण्याचा संभव असतो. गरिबी नसलेल्या घरात नव्या मुलाचा जन्म अनेक प्रकारची आर्थिक जबाबदारी निर्माण करतो. [ शाळेचा प्रवेश, शिक्षणाचा खर्च ] त्यामुळे तेथे कुटुंब लहान ठेवण्याचा प्रयत्न होतो. गरिबी असल्यास असा प्रयत्न होत नसल्याने तेथे जननदर जास्त दिसतो.

* शेतीव्यवसायावर अवलंबून - एकूण रोजगारात शेतीचे स्थान मोठे आहे. ग्रामीण भागात शेती हाच मुख्य आधार आहे. शेतीत काम करण्यासाठी दुसऱ्यांदा घेण्यापेक्षा आपल्याच कुटुंबातील लोक असणे फायद्याचे ठरते. त्यामुळे शेतीव्यवसायावरील अवलंबन लोकसंख्येच्या वाढीला चालना देते. घरातील वाढत्या लोकसंख्येला शेतीतील रोजगारात सामावून घेतल्याने तो शेतीरोजगारात महत्वाचा आधार ठरतो.

* खेड्यांचा प्रभाव - जरी स्वातंत्र्य काळात ओद्योगीकरनाचे प्रयन्त झाले असले तरी त्याचा परिणाम म्हणून नागरीकरणात किंवा शहरीकरणात प्रभावी वाढ झाली नाही. शहरात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण सन १९५०-५१ ते सन २०००-२००१ या काळात १७.६२% वरून २७.७८% एवढेच वाढले. रॉबर्ट कसेन मते शहरीकरणाच्या प्रक्रियेतून जननदर घटविणारे घटक प्रभावित होतात. परंतु हि प्रक्रिया अद्याप कार्यरत झालेली नाही. 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.