शुक्रवार, २० मे, २०१६

भारतीय औद्योगिक संस्था

२.१०.८ भारतीय औद्योगिक संस्था [ Indian Institutes of Technology ] 

* औद्योगिक संस्था कायदा १९६१ अन्वये अभियांत्रिकी तांत्रिक संस्था स्थापन केल्या आहेत. या

* संस्था स्वायत्त स्वरूपाच्या असून त्यांना [महत्वाच्या राष्ट्रीय संस्था] असा दर्जा देण्यात आला आहे.

* १९६१ च्या कायद्यानुसार आयआयटी खरगपूर [१९५१], आयआयटी बॉम्बे [१९५८], आयआयटी मद्रास [१९५९], आयआयटी कानपूर [१९५९], आयआयटी दिल्ली [१९५९], आयआयटी गोवाहाटी [१९९४], आयआयटी रुरकेला [२००१], अशा सात संस्था स्थापन केल्या गेल्या.

* २०१० मध्ये या कायद्यात बदल करून आणखी ९ आयआयटी सथापन केल्या गेल्या त्यामध्ये आयआयटी रोपर रुपनगर [२००८], आयआयटी भुवनेश्वर [२००८], आयआयटी गांधीनगर [२००८], आयआयटी हैद्राबाद [२००८], आयआयटी पटना [२००८], आयआयटी इंदोर [२००९], आयआयटी राजस्थान [२००८], आयआयटी मंडी [२००९]  

* आयआयटी कौन्सिलमार्फत या सर्व संस्था जोडल्या जातात. असून प्रवेश प्रक्रियेवर बोर्ड ऑफ कौन्सिल नियंत्रण ठेवते.

* प्रवेश प्रक्रिया सामाईक असून आयआयटी - जेईइ अशी प्रवेश प्रक्रिया असते.

* साधारणता ५० विद्यार्थ्यापैकी एका विद्यार्थ्यांची निवड होते. प्रवेश प्रक्रियेसाठी गेट म्हणजे कॉमन टेस्ट असते. एमएस सी करिता [ joint admission test ] परीक्षा घेतल्या जातात.

आयआयटी - इतिहास 

* आयआयटी चा इतिहास दुसऱ्या महायुद्धानंतर औद्योगिक विकासासाठी १९४६ साली सर जोगेंद्रसिंह यांनी नलिनी रंजन सरकार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली.

* उच्च तंत्र शिक्षणसंस्था स्थापन करण्यासाठी स्थापन झालेल्या या २२ तज्ञाच्या समितीने देशात विविध प्रदेशात तंत्र शिक्षण संस्था स्थापन करण्याची शिफारस केली.

* खरगपूर येथे हिजली डिटेशन या ठिकाणी पहिली आयआयटी १५ डिसेंबर १९५० रोजी स्थपन करण्यात आली.

* सरकार समितीच्या आधारे मुंबई, दिल्ली, चेन्नई, कानपूर, व दिल्ली येथे आयआयटी स्थापना करण्यात आली.

संघटनात्मक रचना 

* भारताचे पंतप्रधान हे बोर्ड ऑफ कौन्सिल चे पदसिद्ध सदस्य आहेत. तर राष्ट्रपतीच्या अधिपत्याखाली आयआयटी कौन्सिल असते.

* यामध्ये उच्च शिक्षण केंद्रीय मंत्री, सर्व आयआयटी चे संचालक व अध्यक्ष युजीसीचे अध्यक्ष, मानव विकास मंत्री समाविष्ट असतात.

* आयआयटी कौन्सिलच्या कक्षेत प्रत्येक आयआयटी संचालक मंडळ असते. या संचालक मंडळाचे हे आयआयटीचे प्रशासन पाहत असतात.

प्रवेश प्रक्रिया 

* या संस्थेत प्रवेश प्राप्त करण्यासाठी जेईई हि परीक्षा द्यावी लागते.

* वयोमर्यादा महत्तम २५ वर्षे व मागासवर्गीयासाठी ३० वर्षे आहे. एस सी साठी १५%, तर एस टी साठी ७.५% जागा राखीव करण्यात आल्या आहेत.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.