गुरुवार, २६ मे, २०१६

राष्ट्रीय आरोग्य अभियान

४.६ राष्ट्रीय आरोग्य अभियान 

व्याप्ती व स्वरूप 

* आरोग्य सुविधांमध्ये समन्वय साध्य करणे आरोग्य सुविधांचा विस्तार व गुणवत्ता वाढ या उदिष्टांची भारतीय आरोग्य मंत्रालयाने १२ एप्रिल २००५ रोजी आरोग्य अभियानाची सुरवात झाली.

* ग्रामीण पातळीवर पंचायत समितीच्या सहाय्याने आरोग्य सुविधा बळकट केली जाणार आहे. ग्रामीण भागातील गरीब व दुर्बल घटकांना परवडेल अशा प्रभावी आरोग्य सुविधा उपलब्द करून देणार आहे.

* यासाठी आशा यांचा वापर केला गेला आहे. राज्य आरोग्य अभियान हे जिल्हा पातळीवर आणि गरम पातळीवर अंमलबजावणीचा कार्यक्रम निर्धारित करते. .

उदिष्टे 

* बालमृत्यू प्रमाण घटविणे, अन्न व पोषणमुल्ये स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य यांची सार्वत्रिक व सर्वकाळ व सर्व घटकांना उपलब्धता.

* संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांचे नियंत्रण व्यापक आणि सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्द करणे.

* लोकसंख्या स्थिरीकरण, स्त्री - पुरुष असमतोल घटविणे, आरोग्यदायी जीवनशैली.

अपेक्षित फलश्रुती

* बालमृत्यू प्रमाण २०१२ सालापर्यंत दरहजारी ३० इतके कमी करणे. बाळंतपणात मृत्यूदर प्रतीलक्ष १०० पर्यंत कमी करणे.

* मलेरिया व मृत्यूदर सन २०१० पर्यंत ५०% व तो सन २०१२ पर्यंत आणखी १०% घटविणे.

* कॉलरा आजाराचे सन २०१२ पर्यंत पूर्ण उच्चाटण करणे, डेंग्यू मृत्यूदरात २०१० सालापर्यंत ५०% घट करणे.

* मोतीबिंदू ऑपरेशन सन २०१२ पर्यंत ४६ लाख करणे, कुष्टरोग प्रमाण प्रती १०,००० मध्ये १ पेक्षा कमी करणे.

* टिबी सारखा रोग बरा होण्याचे प्रमाण ८५% ठेवणे, ४ लाख आशांची नेमणूक करणे. प्राथमिक आरोग्याचा दर्जा सुधारणे.

खर्च 

* राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाकांक्षी कार्यक्रमासह २००५ साली ६५५ कोटी रुपये, २००६ साली ७७४, २००८ साली १३५० कोटी, तर २०१२ मध्ये २,३५६ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली.

* ५ वर्षाच्या काळात योजनेवर ४ पटीहून खर्च झालेला दिसतो.
























0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.