मंगळवार, १७ मे, २०१६

प्राथमिक शिक्षणाचे नवे प्रवाह

प्राथमिक शिक्षणाचे नवे प्रवाह 

* प्राथमिक शिक्षणाचे मुलभूत हक्क - प्राथमिक शिक्षणाचा मुलभूत हक्क मान्य करण्याचा ठराव १९९६ साली राज्य शिक्षण सचिवांच्या परिषदेमध्ये करण्यात आला.

* प्राथमिक खाजगी शाळांना मदत - स्वयंसेवी संस्था व खासगी क्षेत्राने राहण्याची सोय असणारी प्राथमिक शाळा स्थापन करावी यासाठी १९९६ च्या अंदाजपत्रकात याची तरतूद करण्यात आली.

* उत्पादन शुल्क रद्द - वह्या आणि पुस्तके यांचा खर्च कमी करण्याच्या भूमिकेतून राज्य क्रम पुस्तक महामंडळास पुरविल्या जाणाऱ्या उत्पादन शुल्क सन १९९६ नंतर पूर्णता रद्द करण्याचा निर्णय घेण्यास आला.

* राष्ट्रीय शिक्षक-शिक्षण परिषद [ NCTE - National Council for Teacher Education ] - राष्ट्रीय शिक्षक - शिक्षण परिषद या संस्थेची स्थापना सन १९९५ मध्ये करण्यात आली. प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणे संस्थाना मान्यता देणे तसेच शिक्षकांची गुणवत्ता वाढविणे, शिक्षकांच्या गुणवत्तेचे निकष ठरविणे यावर राष्ट्रीय पातळीवर नियंत्रण करणारी संस्था म्हणून याचे कार्य म्हणून महत्वाचे आहे.

* पोषक आहार राष्ट्रीय योजना [ NP-NSPE ] - National Programme Of Nutritional Support to Primary Education ] - १९९५ मध्ये हि योजना सुरु करण्यात आली. शाळेतील उपस्थिती वाढवावी, शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे व मुलांचे कुपोषण कमी व्हावे, यासाठी १ ली ते ५ वी पर्यंतच्या मुलांकरिता हि योजना राबविली जाते.

* जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम [ DPEP - District Primary Education Programme ] - प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रीकरणासाठी केंद्रपुरस्कृत हि योजना आहे. मुलीच्या शिक्षणास यामध्ये महत्व असून शालेय इमारत, अनौपचारिक शिक्षण केंद्र उघडणे, मागासवर्गीयाकरिता विशेष शाळा यासाठी यातून मदत केली जाते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.