बुधवार, १८ मे, २०१६

अपंगाचे शिक्षण

२.४.२ अपंगाचे शिक्षण 

अपंगाच्या शिक्षणातील अडचणी व समस्या 

* आपल्या देशात अपंगाची लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे त्यांना सोई उपलब्द नाहीत.


* अपंगाच्या संख्येत त्यांना प्रमाणात त्यांना शिक्षण देणाऱ्या संस्था व शाळांचे प्रमाण फारच कमी आहे.

* अपंगाना शिक्षण देणारे व घेणारे हे दोघेही निराशावादीच असतात.

* सुविधा व साधनाचा अभाव आहे.

* अपंगाबाबत असलेल्या कायद्याच्या बाबतीत उदासीनता आहे.

अपंगांच्या शिक्षणासाठी शासकीय योजना 

केंद्रशासनाची अपंग एकात्म शिक्षण योजना 

* १९७६ साली संयुक्त राष्ट्रसंघाने अपंग वर्षाच्या निमित्ताने अपंगाना विशेष शाळेतून शिक्षण देण्याएवजी सामाण्य शाळेतून शिक्षण द्यावे अशी शिफारस केली.

* भारतातदेखील अपंगाच्या खास शाळा होत्या परंतु त्या शाळा ह्या शहरापुरत्याच होत्या, पण यातून अपंगाचे सामाजिक स्थान दुय्यम राहत असे.

* हे दूर करण्यासाठी अपंग एकात्म शिक्षण सुविधा दिल्या जातात. महाराष्ट्रात हि योजना प्राथमिक शिक्षण संचानालयाकडून राबविली जाते. यामध्ये ८ मुलांचे एक असे युनिट मानले जाते.

* अनुदानप्राप्त शाळांना हि योजना लागू होते. या योजनेंतर्गत अपंगासाठी उपकरणे घेण्यासाठी २००० रुपये, वह्या ४००, गणवेश २०० एवढे रुपये दिले जातात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.