शनिवार, २८ मे, २०१६

कमाल जमीनधारणाविरोधी भूमिका

कमाल जमीनधारणाविरोधी भूमिका 

* उत्पादनवाढीवर मर्यादा - कमाल जमीनधारणा कायद्यामुळे मोठ्या जमीन मालकांच्या शेतीमध्ये करण्यात येणाऱ्या भांडवली गुंतवणुकीवर आपोआपच मर्यादा येतील.

* शेती खर्चात वाढ - शेती खर्चात होणारी वाढ हा एक महत्वाचा तोटा कमाल जमीनधारणा कायद्याचा असतो.

* बिनकिफायतशीर शेती - लहान - लहान धारण क्षेत्राच्या निर्मितीमुळे शेती अप्रत्यक्षपणे बिनकिफायतशीर बनते. लहान धारण क्षेत्राच्या बाबतीत जनावरे आणि अवजारे इत्यादी घटकांचा योग्य वापर येत नाही.

* अन्नधान्याचे कमी विक्रीयोग्य अधिक्य - लहान शेतकऱ्याकडे भांडवली कमतरता असते आणि सुधारित तंत्राचा वापर करण्याच्या दृष्टीने त्यांच्या मर्यादा असतात.

महाराष्ट्रातील जमीनधारणा कायद्याची अंमलबजावणी 

* या कायद्याची अंमलबजावणी २ ओक्टोंबर १९७५ साली करण्यात आली. या कायद्यामुळे धारण क्षेत्रावर मर्यादा घालण्यात आली.

* बागायती व कोरडवाहू जमिनीनुसार धारण क्षेत्राची क्षमता क्षेत्राची कमाल मर्यादा वेगवेगळी होती. केंद्र सरकारने १९७२ साली कमाल जमीनधारणेचा सुधारित कायदा संमत केला.

* जमीन बारमाही सिंचनाखाली असेल तर जास्तीत जास्त १८ एकर जमीन राहील.

* विहिरीतून बारमाही पाणी मिळत असेल तर, खाजगी लिफ्टने बारमाही पाणी मिळत असेल तर, किंवा पाटाने हंगामी पाणी मिळणारी जमीन असेल तर २७ एकर जमीन राहील.

* पाटाने हंगामी पाणी मिळत असेल, परंतु पाणी सतत मिळण्याचे आश्वासन असेल तर कमाल मर्यादा क्षेत्र ३६ एकर राहील.

* इतर कोरडवाहू जमीन असल्यास मर्यादा क्षेत्र ५४ एकर राहील. 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.