गुरुवार, १९ मे, २०१६

शिक्षणातील संस्थात्मक सहभाग - शैक्षणिक प्रक्रियेचे प्रकार

२.७ शिक्षणातील संस्थात्मक सहभाग 

शैक्षणिक प्रक्रियेचे प्रकार

* औपचारिक शिक्षण - जी शिक्षण प्रक्रिया साचेबद्ध पद्धतीने आणि नियमाने चालते तिला औपचारिक शिक्षण असे म्हणतात. शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे यासारख्या शिक्षणसंस्थामधून दिले जाणारे शिक्षण हे औपचारिक असते. यामध्ये शिक्षण प्रक्रिया हि कालबद्ध, नियमबद्ध, विशिष्ट उदिष्टनुरूप असते. ठराविक अभ्यासक्रम, ठरावीक विद्यार्थी व शिक्षक, अभ्यासक्रम ठरवून दिलेला असतो.

* सहज शिक्षण - कोणत्याही प्रकारचा आकार, साचा नसलेली ज्ञान, कौशल्य संपादन करण्याची पद्धत म्हणजे सहज शिक्षण होय. जीवन जगात असणाऱ्या मिळणाऱ्या अनुभवातून इतरांच्या अनुकरणातून, मार्गदर्शनातून कौशल्य व मुल्ये संपादित केली जातात. यामध्ये कोणताही संस्थात्मक सहभाग नसतो. परिस्थिती अभ्यासून घेतलेले शिक्षण म्हणजे सहज शिक्षण होय.

* अनौपचारिक शिक्षण - औपचारिक शिक्षणाच्या चौकटीबाहेर शिक्षणाच्या गरजा पूर्ण करणारी व्यवस्था म्हणजे अनौपचारिक शिक्षण होय. अनौपचारिक शिक्षण हे सहज शिक्षणापेक्षा वेगळे आहे. सहज शिक्षणासाठी सुविहित व्यवस्था नसते तर अनौपचारिक शिक्षणासाठी सुवीहीत व्यवस्था करण्यात आलेली असते.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.