सोमवार, ३० मे, २०१६

चालू घडामोडी २७ - ३१ मे २०१६


चालू घडामोडी २७ - ३१ मे २०१६ 

* ज्येष्ठ समीक्षक र. गा. जाधव यांचे निधन, यांनी निळी पहाट, संध्यामायीच्या गोष्टी, समीक्षेतील अवतरणे, इत्यादी पुस्तकांचे लेखन केले. 

* खगोलशास्त्रज्ञानांना आंतरराष्ट्रीय पथकाने रेड गेझर्स आकाशगंगा नवा प्रकार शोधून काढला आहे.

* फुटबॉलपटू मेस्सी, टेनिसपटू नोवाक जोकोविक, यांना मागे टाकत विराट कोहली हा जगातील सर्वाधिक मार्केटेबल खेळाडूची निवड झाली आहे.

* भारताने २९० किलोमीटर पल्ल्याच्या लाभ देणाऱ्या सुपर सॉनिक ब्राम्होस क्षेपणास्त्र याची यशस्वी चाचणी केली होती. हे क्षेपणास्त्र जगातील सर्वात श्रेष्ठ सुपरसॉनिक क्षेपणास्त्र असल्याचे सिद्ध केले आहे.

* मान्सूनचा अंदाज अचूक प्राप्त व्हावा यासाठी भू विज्ञान विभागाने [ मिशन मान्सून ] हा प्रकल्प सुरु केला आहे.

* आय. पी. एल च्या नवव्या सीजन मध्ये सनराईज हैद्राबाद या संघाने रॉयल चालेंजर बंगलोर या संघाला परभूत करून हैराबाद हा संघ विजयी झाला.

* भारतात प्राचीन संस्कृतीची सिंधू संस्कृती विषयी आय आय टी खरगपूर या संस्थेच्या मते हि संस्कृती ८००० हजार वर्षापूर्वीची जुनी आहे. पूर्वी काही संशोधकाच्या मते सिंधू संस्कृती ५५०० वर्षपूर्वी जुनी आहे असा दावा केला होता.

* आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या सीमा पुनिया हिने यंग थ्रोवर्स यंग क्लासिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून रीवो ऑलिम्पिक साठी जागा निश्चित केली.

* PMO म्हणजेच पंतप्रधान कार्यालयाची वेबसाईट आता सहा प्रादेशिक भाषामध्ये उपलब्द झाली आहे. बंगाली, मल्याळम, तेलगु, गुजराती, मराठी, तमिळ, तेलुगु,या सहा भाषामध्ये साईट उपलब्द झाली आहे.

* दिलीप वेंगसकर यांना मुंबईत झालेल्या सिएट २०१५-१६ च्या पुरस्कार सोहळ्यात यांना जीवन गौरव पुरस्कार प्राप्त केला आहे. विराट कोहली याला टी २० चा सर्वोत्तम खेळाडू घोषित करण्यात आले.

* इंग्लंडच्या जो रूटला या वर्षीचा आंतरराष्ट्रीय खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे.

* केळी या फळ उत्पादनात भारत आता जगात क्रमांक एकवर झाला आहे, भारतात सुमारे ३० मिलियन टन केळी उत्पादन होऊन सध्या एक नंबर भारत आहे. यात कमी क्षेत्राच्या मानाने जळगाव जिल्ह्यातील शेतकर्यांनी जास्त उत्पादन घेऊन देशात आघाडी प्राप्त केली आहे.

* १९७७-७८ मध्ये केळीचे उत्पादन हेक्टरी १७ क्विन्टल होते. ते आता ६५ टनापर्यंत येवून पोहोचले आहे. हि किमया आधुनिक शेती बियाणे व ड्रीप इरिगेशन च्या सहाय्याने उत्पादन वाढले आहे.

* इंग्लंडचा कर्णधार अलिस्टर कूक याने कसोटी क्रिकेट मध्ये १० हजार धावा पूर्ण करताच अनेक विक्रम आपल्या नावावर केले. सचिन तेंदुलकर याचा विक्रम मोडून कमी वयात व कमी कालावधीत १० हजार धावा काढणारा कूक हा फलंदाज ठरला आहे.

* जपानमधील दूरसंचार कंपनी सॉफ्ट बँक भारतात १० हजार डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक आगामी पाच ते १० वर्ष करणार आहे.

 

 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.