सोमवार, ३० मे, २०१६

ग्रामविकासातील सहकारी संस्थांची भूमिका

५.४ ग्रामविकासातील सहकारी संस्थांची भूमिका 

५.४.१ ग्रामीण पतपुरवठा 

* ग्रामीण पतपुरवठा हा शेती उत्पादनासाठी तसेच सामाजिक न्यायासाठी आवश्यक अशी पूर्वअट असते.

* ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तसेच कारागिरांना आवश्यक कर्जाची गरज उत्पादक कारणासाठी उत्पादक तसेच अनुत्पादक कारणासाठी देखील असते.

* जमीन सुधारणा करण्यासाठी, विहीर खणण्यासाठी, ट्रक्टर घेण्यासाठी, अशा विविध कारणासाठी कर्ज घेत असतात.

* जे कर्ज एक वर्षाच्या आतील कालावधीसाठी घेतले जाते त्या कर्जाला आपत्कालीन कर्जपुरवठा म्हटल्या जाते.

* अनुत्पादक कर्ज हे घरगुती समारंभ अडचणी यासारख्या कारणासाठी घेतले जाते, असे कर्ज शेतकऱ्यासाठी महत्वाचे असले तरी कर्ज देणाऱ्या वित्तसंस्था कर्ज देण्यास फारशा उत्सुक नसतात.

५.४.३ ग्रामीण कर्जपुरवठ्यातील घटक 

* बिगर - संस्थात्मक किंवा पारंपारिक घटक - शेतकऱ्यांना आजही या बिगर संस्थात्मक कर्जाचा मदतीचा आधार घ्यावा लागतो. शेतकऱ्यांना सावकार, शेतमाल विकत घेणारे अडते, मित्र, नातेवाईक, यांचा समावेश होतो.

* संस्थात्मक घटक - प्राथमिक सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राज्य सहकारी संस्था, अशी रचना आहे. भूविकास बँका, तसेच १९७० नंतर व्यापारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, या सारख्या संस्था यात समाविष्ट आहे.

  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.