शुक्रवार, १३ मे, २०१६

बेरोजगारीचे प्रकार

१.५.१ बेरोजगारीचे प्रकार 

* रचनात्मक बेरोजगारी - अर्थव्यवस्थेतील उपलब्द भांडवल साधनसामग्री, तंत्रज्ञान यांच्या अपुरेपनामुळे किंवा अर्थव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे लोकांना रोजगार मिळत नाही, तेव्हा रचनात्मक बेरोजगारी निर्माण होते.

* शहरी बेरोजगारी - शहरी भागात राहणाऱ्या कामगारांना ओद्योगिक मंदी किंवा अन्य कारणामुळे रोजगार मिळत नाही. त्याला शहरी बेरोजगारी असे म्हणतात. उद्योगात भांडवल तंत्राचा वापर, शहरी लोकसंखेत झालेली वाढ, खेड्यापासून शहराकडे होणारे स्थलांतर अशा कारणामुळे बेरोजगारी वाढते.

* ग्रामीण किंवा कृषी क्षेत्रातील बेरोजगारी - ग्रामीण भागातील बेरोजगारीत अशिक्षितांच्या बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागात किंवा कृषीक्षेत्रात प्रामुख्याने दिसणारी बेरोजगारी म्हणजे छुपी बेरोजगारी होय.

* छुपी बेरोजगारी - जी व्यक्ती रोजगारावर काम करीत आहे असे वाटते, पण प्रत्यक्षात उत्पादनात कोणतीही भर घालत नाही. अशा व्यक्तीला छुपे रोजगार असे म्हणतात. ज्यांची सीमांत उत्पादकता शून्य असते. [ उदा - एका शेतकऱ्याच्या ५ एकर जमिनीवर ६ लोक काम करतात व १०० पोती गहू उत्पादन करतात. म्हणजे ६ लोक रोजगारावर दिसतात. समजा यातून एका व्यक्तीस कामावर न घेता उत्पादन केले आणि उत्पादन पूर्वीइतकेच आले. तर ती व्यक्ती छुपी बेरोजगार आहे असे समजल्या जाते.

* न्यून किंवा अपुरी बेरोजगारी - जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या कुवतीपेक्षा किंवा पात्रतेपेक्षा कमी दर्जाचे काम पत्करावे लागते. तेव्हा त्यास अपूर्ण रोजगार असे म्हणतात. पदवीधर व्यक्तीने फळे किंवा भाजीपाला विकणे इत्यादी.

* हंगामी बेरोजगारी - भारतीय शेतीत प्रामुख्याने या प्रकारची बेरोजगारी दिसते. शेतीतील हंगाम संपल्यानंतर अनेकांना काम मिळत नाही. अशांना हंगामी बेरोजगार असे म्हणतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.