गुरुवार, ५ मे, २०१६

चालू घडामोडी १ ते ५ मे

चालू घडामोडी १ ते ५ मे

* गुजरात सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांसाठी १०% आरक्षण जाहीर केले. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६ लाखापेक्षा कमी आहे त्यांनाच या आरक्षणाचा लाभ मिळेल.

* आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला आरक्षण देणारे गुजराथ हे पहिले आरक्षण होय.

* नासाच्या हबल या दुर्बिणीतून शोधलेल्या या मेकमेक हा चमकदार ग्रहाचा शोध लागला असून तो ग्रह बर्फाळ असून एमके २ असे टोपण नाव देण्यात आले.

* दारिद्र्य रेषेखालील ५ कोटी लोकांसाठी उज्वला या योजनेचे उद्घाटन मोदिजी यांनी केले या योजनेअंतर्गत त्यांना मोफत गस कनेक्शन देण्यात येईल.

* विश्व तिरंदाजी स्पर्धेत एक रौप्य तर दोन कास्य पदकाची कमाई केली.

* केंद्र सरकारने पर्यटनासाठी [प्रसाद] [ स्वदेश दर्शन ] या नवीन योजना सुरु केल्या.

* मास्टर ब्लास्टर सचिन तेंदुलकर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या स्पर्धेसाठी सदिच्छा दूत म्हणून निवड करण्यात आली.

*  जगातील सर्वात लहान इंजिन तयार करण्यात यश. एक मीटरच्या काही अब्जावा भाग हे इतके लहान इंजिन आहे.

* जम्मू काश्मीर मध्ये केंद्र सरकार आयआयटी स्थापन करणार आहे.

* रिओ येथे ऑलिम्पिकसाठी भारतातर्फे ८६ खेळाडू पात्र.

* देशात रोजगार निर्मितीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, तर कर्नाटक पहिल्या स्थानावर, तामिळनाडू तिसऱ्या, नंतर आंध्र प्रदेश व तेलंगाना, हरयाणा, उत्तरप्रदेश, त्यानंतर गुजरात या क्रमवारीत सातव्या क्रमांकावर आहे.

* जानेवारी ते मार्च या महिन्यात ८.८८ लाख एवढा रोजगार निर्माण झाला असे असोचम या संस्थेने सांगितले.

* भारतीय संघ आयसीसी च्या क्रमवारीत टी-२० त दुसऱ्या स्थानावर तर एकदिवसीय क्रमवारीत ४ थ्या स्थानावर आला.    

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.