सोमवार, ३० मे, २०१६

ग्रामीण रोजगार योजना

५.५ ग्रामीण रोजगार योजना

* आजही भारतातील ६०% लोकसंख्या शेतीवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अवलंबून आहे. म्हणजेच ही सर्व लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते.

* २००० मध्ये भारतातील व्यवसायनिहाय रोजगारीचे विभाजन दर्शविले आहे, यामध्ये असे दिसून आले की, ७५.८१% श्रमशक्ती ग्रामीण भागात विखुरलेली आहे.

* त्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया यांचे प्रमाण अतिशय विषमतोल आहे, त्यामध्ये २६.३६% प्रमाण महिला श्रमिकांचे आहे.

* सन १९९९-२००० मध्ये ग्रामीण भागात काम करणाऱ्या एकूण पुरुष श्रमिकापैकी ३९.६% श्रमिक निरक्षर होते. श्रमिक महिलांपैकी ७३.९% श्रमिक महिला निरक्षर होत्या.

* बेरोजगारी कमी करण्यासाठी किंवा ग्रामीण भागात रोजगार वाढवण्यासाठी डिसेंबर २००४ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे विधेयक संसदेत मांडले गेले. नंतर २००५ मध्ये याचे कायद्यात रुपांतर झाले.

* फेब्रुवारी २००६ मध्ये ही योजना प्रत्यक्षात लागू झाली. महाराष्ट्राने अशाच प्रकारची योजना सन १९७५ च्या दरम्यान लागू केली. हे एक क्रांतीकारी पाऊल मानले गेले. अशा प्रकारची योजना कार्यवाहीत नाही.

* वेतन रोजगाराची कायदेशीर हमी - या योजनेप्रमाणे ग्रामीण भागात वेतन रोजगाराची हमी दिली जाते. तिचे प्रमाण अभूतपूर्व आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.