गुरुवार, १९ मे, २०१६

प्रौढ शिक्षण

२.७.२ प्रौढ शिक्षण 

* प्रौढ शिक्षण हा अनौपचारिक शिक्षणाचाच एक भाग आहे. औपचारिक शिक्षण व सहज शिक्षण यांच्यातील दुवा म्हणजे प्रौढ शिक्षण होय. 

* जीवनभराच्या जबाबदाऱ्या पार पडण्यासाठी स्त्री पुरुषांनी आपल्या क्षमतेनुसार, गरजेनुसार घेतलेले सर्व प्रकारचे शैक्षणिक अनुभव म्हणजे प्रौढ शिक्षण होय. 

* प्रौढ शिक्षणाची उदिष्टे - प्रौढ शिक्षनाबाबत युनेस्कोने १९७६ साली उदिष्टे स्पष्ट केली आहेत. 

* नवीन ज्ञान, दृष्टीकोन गुणवत्ता व वर्तणुकीतील बदल प्राप्त करण्यासाठी दृष्टीकोन विकसित करणे. 

* महत्वाच्या समस्यांबाबत आणि सामाजिक बदलाबाबत जाणीव जागृती निर्माण करतात. 

* कामाच्या जगात व्यक्तिगत सहभागीत्वाचे महत्व व्यक्तीस जाणून देणे. 

* भौतिक व सांस्कृतिक वातावरण आणि लोक यांच्यामधील संबंध बाबत जाणीव जागृत करणे. 

* परंपरा आणि संस्कृतिच्या विविधतेबद्दलच्या आत्मीयता निर्माण करणे. 

* राष्ट्रीय पातळीवर १९७७ साली राष्ट्रीय प्रौढ शिक्षण मंडळाची स्थापना करणायत आली आहे. यामध्ये शिक्षणमंत्री, विद्यापीठ अनुदान आयोग, समाज कल्याण मंडळे ग्रामोद्योग मंडळ व भारतीय प्रौढ संस्था यांचे प्रतिनिधी असतात. 

* राज्य पातळीवर प्रौढ शिक्षणाचे प्राधिकरण असून मुख्यमंत्री त्याचे परमुख असतात. 

* जिल्हा पातळीवर जिल्हा शिक्षण मंडळ असून शिक्षणाच्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन आणि प्रशासन त्याच्याकडे सोपविले जाते. 

* ग्रामपातळीवर ग्रामशिक्षण समिती स्थापन आली असून ग्रामीण शिक्षणाबाबत जबाबदाऱ्या या समितीवर सोपविण्यात आल्या आहेत. 
 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.