सोमवार, २३ मे, २०१६

व्यावसायिक शिक्षणाच्या समस्या व उपाययोजना

३.५ व्यावसायिक शिक्षणाच्या समस्या व उपाययोजना 

व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणाच्या समस्या 


* विद्यार्थ्यांचे अल्प प्रमाण - व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणाकडे एकूण विद्यार्थ्यापैकी फक्त ५% विद्यार्थीच वळतात. हे प्रमाण अनेक देशात ६०% पेक्षा अधिक आहे.

* नकारात्मक दृष्टीकोन - व्यावसायिक शिक्षणाकडे वळणारे विद्यार्थी म्हणजे कमी दर्जाचे असा नकारात्मक समज आहे.

* अधिक खर्च - जरी व्यावसायिक शिक्षणाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्याचे प्रमाण अल्प असले तरी प्रतिविद्यार्थी येणारा खर्च मात्र अधिक आहे.

* सर्वसाधारण शिक्षणाकडे ओढा - व्यावसायिक शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी व्यवसायाकडे न वळता ते पुन्हा उच्च शिक्षणाच्या प्रवाहापुढे जातात.

* अपुरा व कार्यक्षम - व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणासाठी उपलब्द होणारा निधी अकार्यक्षमपणे वापरला जातो.

* मागणीकडे दुर्लक्ष - व्यवसायिक आणि तांत्रिक शिक्षण हे पुरवठा केंद्रित म्हणजेच जे कोर्सेस संस्था देवू शकते त्याचा पुरवठा करणारे आहे.

* उद्योजकांचा सहभाग नाही - व्यवसायिक प्रशिक्षणाचा वापर करणारे उद्योजक असतात. परंतु त्याची भूमिका प्रशिक्षणामध्ये नगण्य असते.

* अनौपचारिक क्षेत्र दुर्लक्षित - एकूण रोजगारापैकी ९०% रोजगार हा अनौपचारिक व असंघटीत क्षेत्रात आहे.

* सुविधांची टंचाई - प्रशिक्षणावर होणाऱ्या खर्चापैकी मोठा हिस्सा वेतनावर खर्च होतो.

* समन्वय नाही - व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण देणारी विविध संस्था कार्य करीत असून त्यांचे नियमन, नियंत्रण करणारी प्रभावी यंत्रणा अद्यापी नाही.
   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.