सोमवार, २३ मे, २०१६

व्यवसायिक शिक्षणावर जागतिक बँकचा अहवाल २००६ - शिफारशी

३.९ व्यवसायिक शिक्षणावर जागतिक बँकचा अहवाल २००६ - शिफारशी 

* जागतिकीकरण, स्पर्धात्मकता आणि ज्ञानकेंद्रित अर्थव्यवस्था हे नवे बदलते समीकरण एक आव्हान आहे.

* सध्याची व्यावसायिक शिक्षणपद्धती नियोजित, नियंत्रित व बंदिस्त अर्थव्यवस्थेला पोषक अशी आहे.

* भारताच्या जलद विकासाचे एक महत्वाचे कारण श्रम उत्पादकतेत झालेली वाढ हे आहे. वाढती उत्पादकता ही शिक्षण व कौशल्य विकास यावर अवलंबून असल्याने व्यवसायिक शिक्षण महत्वाचे ठरते.

* शिक्षणाचा प्रसार वाढला तरी गुणवत्तावाढीसाठी अद्यापि खूप वाव आहे.

* व्यावसायिक शिक्षणाचे प्रमाण अद्यापि ३% आहे.

* व्यासायिक शिक्षणाचे उदिष्ट श्रमबाजारात येण्यापेक्षा उच्च शिक्षणात जाण्याचे आहे.

* उद्योजकांना व्यवसायिक शिक्षणापेक्षा तरुण व चांगली शैक्षणिक गुणवत्ता असणारे कामगार आवश्यक आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.