सोमवार, १६ मे, २०१६

भारतातील मानवी साधनसंपत्तीचा विकास - सराव प्रश्न

भारतातील मानवी साधनसंपत्तीचा विकास - सराव प्रश्न

1] भारतीय लोकसंख्येचे वैशिष्ट्य म्हणजे खालीलप्रमाणे कोणते?
अ] लोकसंख्या मोठ्या आकाराची आहे ब] वाढीचा दर अधिक आहे. क] पर्याय १ व २ बरोबर ड] वरीलपैकी एकही नाही

२] सन १९५१ नंतर लोकसंख्या वाढीचा दर सरासरी इतका राहिला?
अ] १% ब] २% क] ३% ड] ४%

३] लोकसंख्या आकारात मोठी वाढ होते जेव्हा?
अ] मृत्यूदरातील घट ही जननदरातील घटीपेक्षा अधिक असते.
ब] मृत्यूदरातील घट ही जननदरातील घटीपेक्षा कमी असते.
क] मृत्यूदरातील घट आणि जननदरातील घट ही समान असते.
ड] यापैकी एकही नाही.

४] लोकसंख्येतील वाढ ही यावर अवलंबून असते?
अ] जननदर ब] मृत्यूदरावर क] जनन दरावर व मृत्यू दरावर यांच्या फरकावर ड] यापैकी एकही नाही.

५] सन २००१-२०११ या काळात लोकसंख्यावाढीचा दर एवढा होता?
अ] १.६४% ब] २.६४% क] ३.६४% ड] ५.६४%

६] दर चौरस कि. मी. क्षेत्रात सरासरी किती लोक राहतात यावरून?
अ] लोकसंख्या मोजतात ब] लोकसंख्येची घनता मोजतात क] लोकसंख्येचा आकार मोजतात ड] लोकसंख्येची वाढ मोजतात.

७] एकूण जागतिक लोकसंख्येपैकी एवढी लोकसंख्या भारतीय आहे?
अ] १७.५% ब] १८.५% क] १९.०% ड] १९.५%

८] सन २००१-२०११ या दशकात भारतीय लोकसंख्या वृद्धीदर एवढा आहे.
अ] सर्वात कमी होता ब] सर्वात अधिक होता क] समान राहिला होता ड] यापैकी एकही नाही

९] कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या महाविभाजनाचे वर्ष म्हणून ओळखले जाते?
अ] १९२१ ब] १९२० क] १९५१ ड] १९५५

१०] भारतात स्त्रियांचे विवाहाचे सरासरी वय किती वर्षे आहे?
अ] १८ वर्षे ब] २० वर्षे क] २१ वर्षे ड] २५ वर्षे

११] प्रतीहजार पुरुषामागे महिलांचे सरासरी प्रमाण घटत आहे. याचे खालीलपैकी कोणते कारण आहे?
अ] मुलींच्या बाबतीत असणारा नकारात्मक दृष्टीकोन
ब] स्त्री - भृणहत्या
क] माता बनण्याचा काळात होणारे मृत्यू
ड] वरील सर्व बरोबर

१२] नागरीकरण प्रक्रिया गतिमान होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे औद्योगिकीकरणासाठी आणि कृषी विकासासाठी करण्यात आलेली गुंतवणूक हि कोणत्या क्षेत्रातील आहे?
अ] सार्वजनिक क्षेत्र
ब] खाजगी क्षेत्र
क] सरकारी क्षेत्र
ड] यापैकी एकही नाही

१३] सुवर्णजयंती शहरी रोजगार योजनेचा खर्च केंद्रशासन आणि राज्यशासन किती प्रमाणात करते?
अ] ७५% - २५% ब] ५०% - ५०% क] २५% - ७५% ड] २०% - ८०%

 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.