गुरुवार, १२ मे, २०१६

लोकसंख्या धोरणाचे मूल्यमापन

१.२.४ लोकसंख्या धोरणाचे मूल्यमापन 

* नसबंदी आणि गर्भनिरोधक  साधनावर अतिरिक्त भर - लोकसंख्या नियंत्रणाची साधने व तंत्र लोकांना उपलब्द करून दिल्यास लोकसंख्या नियंत्रित होईल असा चुकीचा समज शासनाने करून घेतलेला दिसतो. बालमृत्यूचे मोठे प्रमाण, कुपोषण, स्त्रियांना सामाजिक दर्जा व अंधश्रद्धा अशा अनेक घटकांनी जननदर प्रभावित होतो.

* दारिद्रय हेच कारण - भारतातील मोठे दारिद्रय हे लोकसंख्यावाढीचे परिणाम नसून कारण आहे. जेथे गरीबीचे प्रमाण मोठे व तीव्र आहे तेथे जननदर अधिक असल्याचे स्पष्ट होते. यासाठी दारिद्रयाचा प्रश्न सुटल्यास लोकसंख्या प्रश्न सुटेल यांवर लोकसंख्या धोरण आधारित असण्याची आवश्यकता आहे.

* सक्तीचा गैरवापर - १९७७ नंतर लोकसंख्या नियंत्रणासाठी सक्तीच्या मार्गाचा अवलंब करण्यात आला. एकाधीरशाहीच्या व्यवस्थेतही इतका रानटीपणा दिसला नसेल. नंतर धोरणकर्त्यांची हि चूक लक्षात घेवून आवश्यक ते धोरणात्मक बदल केले.

* स्त्री - साक्षरता - लोकसंख्या नियंत्रणामध्ये सर्वात महत्वाची भूमिका हि स्त्री साक्षरतेतून पार पडली जाते.

* रोख बक्षिशे व भ्रष्टाचार - लोकसंख्या नियंत्रणाची अंमलबजावणी करण्यासाठी जी जोडपी कार्यक्रमात सहभागी होतात. त्यांना तसेच त्यांच्या प्रवर्तकांना रोख बक्षिसे दिली जातात. हा कार्यक्रमात २० ते ३० वयोगटातील जोडपी किती प्रमाणात स्वीकारण्यात यावर लोकसंख्या नियंत्रणात अवलंबून असते.

* लोकसहभाग अल्प प्रमाणात - लोकसंख्या नियंत्रण हि एक शासकीय कार्यक्रमाची बाब राहिली असून तिला लोकचळवळीचे स्वरूप अद्यापि प्राप्त झाले नाही. प्रबोधन, स्त्रियांची व्यासपीठे, बचतगट व सहकारी संस्था अशा विविध माध्यमाची सांगड घालणे गरजेचे आहे.

* विमा - आर्थिक असुर्क्शितेला पर्याय म्हणून गरीब कुटुंबात मुलाकडे पहिले जाते. जर आर्थिक संरक्षण दिले गेले तर लोकसंख्या नियंत्रणास मदत होऊ शकते.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.