बुधवार, ४ मे, २०१६

चालू घडामोडी मार्च - एप्रिल २०१६

चालू घडामोडी मार्च - एप्रिल २०१६

*  निदा फाजली यांना उर्दू अकादमीचा मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात आला, ते प्रसिद्ध शायर आहेत.

* माजी राज्यपाल अझीज कुरेशी यांना अमीर खुसरो पुरस्कार जाहीर केला.

* प्रमुख पुरस्कारात डॉ सुराग मेहंदी यांना राष्ट्रीय एकता पुरस्कार, तर प्रेमचंद पुरस्कार प्राप्त.

* पोलिस, अग्निशामक दल, रुग्णवाहिका या सर्व सेवेसाठी देशभर ११२ हा क्रमांक उपलब्द करण्यात आला.

* ३ एप्रिल रोजी नांदेड येथे झालेल्या राष्ट्र संत तुकडोजी महाराज जन्मशताब्दी निमित्त संमेलनाध्यक्ष डॉ एस. एन. पठाण यांची निवड करण्यात आली.

* टिम चीटोक वर्डस फास्टेस किवी म्हणून भारताच्या सुवर्ण चतुर्भुज या ६००० हजार किमीच्या सायकल यात्रा पूर्ण करून नवीन विक्रम स्थापन केला.

* ग्रामीण आवास योजनेअंतर्गत सरकार २.९५ कोटी घरे बांधण्यात येणार आहे.

* या योजनेअंतर्गत सखल भागासाठी घर बांधण्यासाठी १.२० लाख तर डोंगराळ भागात घर बांधण्यासाठी १.३० लाख आर्थिक मदत पुरविण्यात येईल.

* लष्करी राजवटीतून लोकशाहीवादी राष्ट्राच्या दिशेने प्रवास करणाऱ्या म्यानमारच्या अध्यक्षपदी तीन क़्याव यांनी शपथ घेतली.

* गुरुत्वीय भिंग तंत्राचे बाह्यग्रह शोधण्यात यश मिळाले असून या शोधात एका भारतीय महिलेचा वाटा आहे.

* १ एप्रिल पासून आता रेल्वेचे तिकीट १३९ या क्रमांकाद्वारे रद्द करता येणार आहे.

* बोनमरो रजिस्ट्री स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य त्यामुळे रक्ताचा कर्करोग, सिकलसेल, थ्यलेसेमिआ या सारख्या आजाराचा आधुनिक पद्धतीने उपचार करण्यात येईल.

* स्वछ भारत मोहिमेसाठी जागतिक बँक तर्फे सुमारे १.५ अब्ज [ १० हजार कोटी ] रुपये मदत मिळणार आहे.

* शहर आणि ग्रामीण भागात घर खरेदी करण्यासाठी सरकातर्फे रेडीरेकनरमध्ये ७% वाढ करण्यात आली आहे.

* प्रसिद्ध पार्श्वगायीका पी सुशीला मोहन यांनी भारतीय भाषांमध्ये सर्वाधिक गाणी गायल्याने त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेण्यात आले आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.