सोमवार, ३० मे, २०१६

राष्ट्रीय रोजगार हमी योजना

राष्ट्रीय रोजगार हमी योजना - नरेगा 

* युपीए शासनाने महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेच्या कायद्याचे प्रारूप राष्ट्रीय स्तरावर अमलात आणण्याचे ठरविले आहे. प्रत्येक कुटुंबाला १०० दिवसाचा रोजगार देणारी योजना केली.

* भारतीय संसदेने २००५ साली राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना संमत केला. २००६ रोजी देशातील २०० जिल्ह्यात त्याचा प्रारंभ केला.

* गरीब लोकांना रोजगाराची संधी उपलब्द करून देणे, ग्रामीण जनतेच्या जीवनमानात सुधारणा होण्यासाठी ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास करणे.

* किमान १०० दिवसाच्या रोजगाराची हमी देणे, ही योजना मागणीआधारित आहे.

* ही योजना प्रत्येक ग्रामीण कुटुंबास १०० दिवसाच्या रोजगाराची कायदेशीर हमी देते.

* जर काम मागणाऱ्यास १५ दिवसात काम दिले नाही तर बेरोजगार भत्ता दिला जातो.

* ही योजना मागणीप्रमाणे काम या तत्वावर आधारित आहे.

* यातून जलसंधारण, पाणीपुरवठा, वनीकरण अशी कामे हाती घेतली आहे.

योजनेच्या अटी 

* ग्रामपंचायत पातळीवर नोंदणी आवश्यक असून जॉबकार्ड दिले जाते.

* ग्रामपंचायत पातळीवर नोंदणी आवश्यक असून जॉबकार्ड दिले जाते. नोंदणी ५ वर्षासाठी असेल तर नंतर त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे.

* प्रत्येक कार्डधारकाला या योजनेत अकुशल काम करण्याचा अधिकार आहे. प्रत्येक कार्डधारकास १०० दिवसापर्यंत काम करता येईल.

* ग्रामीण भागात राहणाऱ्यास अकुशल काम करण्यास तयार असणाऱ्यास ही योजना लागू राहील.

* या योजनेत पूर्णत: रोख स्वरुपात किंवा वस्तू व रोख स्वरुपात भत्ता दिला जाईल.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.