सोमवार, ३० मे, २०१६

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

५.५.१ राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची वैशिष्टे 

* किमान रोजगार प्राप्ती - या योजनेप्रमाणे ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील प्रौढाना वर्षांतून किमान १०० दिवसांचा अकुशल शारीरिक कामाचा रोजगार दिला जातो.

* सार्वत्रिक स्वरुपाची योजना - एका वित्तीय वर्षांत ग्रामीण भागातील एका कुटुंबाला किमान १०० दिवसांचा वेतन रोजगार दिला जातो. हे काम अकुशल स्वरूपाचे व शारीरिक श्रमाचे असेल.

* या योजनेत पूर्ण रोजगार आहे असे म्हणण्यासाठी व्यक्तीला वर्षातून किमान २७० दिवस काम मिळावे असे मानले जाते.

* रोजगार मागणीचा हक्क - कायद्याप्रमाणे यामध्ये रोजगार हमी देण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ती वित्तीय साधनसामग्री देण्याचे वैधानिक बंधन पत्करते.

* उत्पादक शक्तीला प्रेरणा - या योजनेमुळे ग्रामीण भागातील उत्पादक शक्तीला प्रेरणा मिळते.

* हक्क प्राप्ती - अकुशल स्वरूपाचे शारीरिक कष्टाचे काम करू इच्छिणारे प्रौढ घटक असणाऱ्या ग्रामीण कुटुंबाना ग्रामपंचायतीमध्ये तशी नोंदणी करण्याचा हक्क मिळतो.

* कुटुंबाची हक्क मर्यादा लक्षात घेवून प्रत्येक पात्र व्यक्तीच्या अर्ज केल्यापासून १५ दिवसाच्या आत रोजगार दिला जाईल.

* उपलब्द करून दिल्या जाणाऱ्या रोजगारापैकी किमान १\३ रोजगार महिलांना उपलब्द केला जाईल.

* खर्चाची जबाबदारी - या योजनेसाठी केंद्र सरकार घटक राज्यांना एकूण खर्चापैकी ९०% निधी देणार आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.