बुधवार, २५ मे, २०१६

चालू घडामोडी २१ - २६ मे २०१६

चालू घडामोडी २१ - २६ मे २०१६

* सौरमालेतील ग्रहांचा शोध लावण्यासाठी नासा राबवीत असलेल्या प्रकल्पात एका मोहिमेसाठी अहमदाबादमधील भारतीय वंशाच्या सुव्रत महादेवन या तरुणाची निवड झाली आहे.

* व्हाईट हाउसचा आक्षेप धुडकावून अमेरिकेच्या रिपब्लिक पक्षाने प्रतिनिधी सभेने राष्ट्रीय संरक्षण प्राधिकरण विधेयक समंत केले आहे.

* माकप पॉलीट ब्युरोचे सदस्य व धर्मदमचे आमदार पिनरयी विजयन केरळचे नवे मुख्यमंत्री होतील. कन्नूर जिल्ह्यातील धर्मदमच मतदारसंघातून ३६ हजार ९५० हजारांनी ते विजयी झाले आहे.

* एनटीपीसीला उर्जा महामंडळाला राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट काम केल्यामुळे पीआर एमओयु एक्सलंस अवार्ड प्राप्त केला आहे.

* विद्यापीठ व महाविद्यालयाच्या मुल्याकासाठी NAC National Assesment and councial या संस्थेने नवीन आठ श्रेणी पद्धत सुरु केली आहे. नव्या धोरणानुसार आता ए ग्रेड ऐवजी ए ए प्लस व ए प्लस प्लस हे ग्रेडेशन लागू होईल.

* माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांची पुदुच्चेरीच्या नायब राज्यपालपदी निवड करण्यात आली.

* आसाम राज्यातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री सर्वानंद सोनेवाल यांची निवड करण्यात आली.

* इस्त्रोने भारतीय बनावटीचे पहिले स्वदेशी रिझुएबल लॉंच व्हेइकल आरएलव्ही बनविले आहे. याचा उद्देश पृथ्वीभोवतीच्या कक्षेत उपग्रह यांना प्रस्थापित करून पुन्हा पृथ्वीवर परत येणे आहे.

* भारत, थायलंड व म्यानमार हे एकत्रितपणे १४०० किलोमीटरचा महामार्ग बांधून त्यामुळे आग्नेय आशिया व भारत रस्त्याने जोडले जाणार आहे. देशातील हा मार्ग म्हणजे भारताच्या [ Act East ] धोरणाचा भाग आहे. 

* अन्नाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांनी एका वर्षात दुसरयांदा त्याच तारखेला तामिलनाडू च्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे जयललिता ह्या पाचव्यांदा मुख्यमंत्री बनल्या आहेत.
   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.