सोमवार, २३ मे, २०१६

शिक्षण : सामाजिक बदल - सराव प्रश्न

शिक्षण : सामाजिक बदल - सराव प्रश्न 

१] भारतीय उच्च शिक्षणास दिशा देणे, आर्थिक मदत देणे, गुणवत्ता मापदंड प्रस्थापित करणे अशा जबाबदाऱ्या पार पाडणारी संस्था कोणती?
अ] केंद्रीय व्यावसायिक प्रशिक्षण संस्था
ब] विद्यापीठ अनुदान आयोग
क] राष्ट्रीय शिक्षक - शिक्षण परिषद
ड] वरीलपैकी एकही नाही

२] खालील हे प्राथमिक शिक्षणाचे महत्वाचे उदिष्ट आहे.
अ] सर्वांसाठी शिक्षण
ब] गळती कमी करणे
क] किमान शैक्षणिक गुणवत्ता धारण करणे

३] सार्वत्रिक शिक्षणाचे उदिष्ट गाठण्यासाठी हे आवश्यक आहे?
अ] पर्यायी शालेय व्यवस्था बळकट करणे
ब] समाजातील सीमांत घटकांना शिक्षण देणे
क] किमान अध्ययन पातळी कार्यक्रम स्वीकारणे
ड] वरीलपैकी सर्व

४] खडू - फळा मोहिमेंतर्गत या सुविधावर भर देण्यात आला आहे?
अ] मुले व मुली यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह
ब] फळा, नकाशे, खेळणी व ग्रंथालय
क] दोन शिक्षक
ड] यापैकी एकही नाही

५] खडू - फळा मोहिमेंतर्गत शाळेची इमारत बांधण्याची जबाबदारी यांची आहे?
अ] राज्यशासनाचा ब] केंद्रशासनाचा क] खाजगी संस्था ड] यापैकी एकही नाही

६] औनोपचारिक शिक्षणाची मदत या शिक्षणाच्या सार्वत्रिकीकारणासाठी घेण्यात आली?
अ] प्राथमिक ब] माध्यमिक क] खाजगी संस्था ड] यापैकी एकही नाही

७] प्राथमिक शिक्षणाची कोणती बाजू सुधारण्यासाठी किमान अध्ययन पातळी कार्यक्रम हाती घेण्यात आली?
अ] संख्यात्मक ब] गुणात्मक क] संख्यात्मक व गुणात्मक ड] वरीलपैकी एकही नाही

८] शिक्षक - शिक्षण परिषद या संस्थेची स्थापना या साली झाली?
अ] १९९५ ब] १९९६ क] १९९७ ड] १९९८

९] शिक्षणापासूनच्या वंचित घटकामध्ये यांचा समावेश होतो?
अ] अल्पसंख्याकाचा ब] आदिवासींचा क] स्त्रियांचा ड] वरील सर्वांचा

१०] राधाकृष्णन आयोग या साली स्थापन करण्यात आला?
अ] १९४८ ब] १९६४ क] १९७७ ड] १९८६

११] राष्ट्रीय शिक्षणव्यवस्था विकसित करण्यासाठी हा आयोग नियुक्त करण्यात आला?
अ] कोठारी आयोग ब] राधाकृष्णन आयोग क] मुदलियार आयोग ड] यापैकी कोणीही नाही

१२] कोठारी आयोग या साली नियुक्त करण्यात आला?
अ] १९६४ ब] १९६८ क] १९७७ ड] १९८०

१३] प्रौढ शिक्षण या पद्धतीने देता येते?
अ] अनौपचारिक शिक्षण ब] दूरशिक्षण क] निरंतर शिक्षण ड] वरीलपैकी एकही नाही

१४] हे शालेय पोषण आहाराचे उदिष्ट आहे?
अ] उपस्थितीचे प्रमाण वाढविणे ब] गळतीचे प्रमाण थांबविणे क] मुलांचे कुपोषण थांबविणे  ड] वरीलपैकी सर्व

१५] सांस्कृतिक शिष्यवृत्ती ही या क्षेत्रांतील कौशल्यास प्रतिवर्षी ६०० ते १२०० रुपये शिष्यवृत्ती मिळते?
अ] नृत्य ब] नाट्य क] संगीत ड] यापैकी सर्व 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.