शुक्रवार, २० मे, २०१६

चालू घडामोडी १५-२० मे २०१६

* चालू घडामोडी १५-२० मे २०१६

* संपूर्णपणे बहुस्तरीत बलीस्टिक मिसाईल सुरक्षा प्रणाली प्राप्त करण्याच्या प्रयत्नात भारताने स्वदेशी सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्र याची चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र त्याच्या दिशेने येणाऱ्या कोणत्याही शत्रू क्षेपणास्त्राला हवेतच नष्ट करण्यास सक्षम आहे.

* अवकाशयानात उड्डाणासाठी भारतीय अवकाश संशोषण संस्था इस्त्रोने स्वताच: अवकाशयान तयार केले आहे.

* दक्षिण कोरियाची लेखिका हान कांग यांच्या द व्हेजिटेरियन या पुस्तकाला साहित्य जगतातील प्रतिष्ठेचा मँन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.

* गुजरात येथील जामनगर येथील जगातील सर्वात मोठी रिफायनरी उभारल्याबद्दल उद्योगपती मुकेश अंबानी यांना नुकतेच [ऑथमर गोल्ड मेडल फॉर अन्त्रोपेनियार लिडरशीप] या पुरस्काराने सन्मानित केले आहेत.

* राज्यातील पहिली नगरपालिका अशी ओळख असलेल्या पनवेलचे राज्यातील २७ व्या महानगरपालिकेत रुपांतर होणार आहे.

* अमेरिकेचे सिनेट भारतीय वंशाच्या मुत्सदी स्वाती दांडेकर यांची आशियाई विकास बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नेमणूक केली आहे. हे पद राजदूताच्या दर्जाचे आहे.

* प्रदूषणाची पातळी वाढल्यामुळे केंद्रीय प्रदूषण संशोधन संस्थेची स्थापना सरकार स्थापन करणार आहे.

   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.